एरंडोल (ता.३ ऑगस्ट २०२५) – महसूल विभागाच्या महसूल सप्ताह २०२५ निमित्त एरंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी, शाळा परिसर, गावठाण, स्मशानभूमी, गायरान जमीन तसेच तलाठी व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात एकूण ४३५ झाडांची लागवड करण्यात आली.
ही रोपे सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री. मानसिंग राजपूत यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमात शेतकरी, नागरिक, सेवाभावी संस्था आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला.
एरंडोलचे तहसीलदार श्री. प्रदीप पाटील यांनी आपल्या परिवारासह एरंडोल-टोळी शिवरस्त्यावर वृक्षारोपण करून जनतेला पर्यावरण जपण्यासाठी प्रेरणा दिली. तसेच नायब तहसीलदार श्री. संजय घुले यांच्या हस्ते पद्मालय रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी मंडळ अधिकारी श्रीमती सुनीता चौधरी, ग्राम महसूल अधिकारी अमर भिंगारे, सागर कोळी, तसेच महसूल सेवक पंकज भोई यांची उपस्थिती होती. महसूल विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.