श्री खंडोबाचे निःस्सीम भक्त व पुजारी असलेले म्हाळसापती
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
श्री खंडोबाची निःस्सीम भक्त व पुजारी असलेले म्हाळसापती यांनी आपले बहुतेक आयुष्य श्री खंडोबा मंदिर नों श्री साईबाबा यांच्यासोबत घालवले. म्हाळसापती यांच्या शिवाय साईलाही राहता आले नाही, कारण म्हाळसापतीच्या माध्यमातून बाबांची खरी ओळख साऱ्या जगाला झाली. आणि म्हाळसापतीद्वारा दिलेले "साई" हे नाव सहजतेने बाबांनी स्वीकारले. कोणतीही औपचारिकता नाही, पूर्वकल्पना नाही, फक्त म्हाळसापतीच्या तोंडून "साई" शब्द बाहेर पडले आणि लोक त्या फकीरला "साई" नावाने हाक मारू लागले. म्हालसापती, कांशीराम शिंपी आणि आप्पा जागले हे तिघे शिडीमध्ये संत, महात्मा, फकिर, मौलवी यायचे त्यांची सारी व्यवस्था करायचे, त्यांची सेवा करायचे, त्यांची सर्व व्यवस्था करायचे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करायचे. या गोष्टीवर ते लक्ष देत होते.
अंदाजे १८५४ साली एके दिवशी दुपारी काही बैलगाड्या धूपखेडा हून (औरंगाबाद) निघाल्या आणि शिर्डीत दाखल झाल्या. चांद पटेल धुपखेडा गावचे पाटील, गावातील इतर लोक, आणि फकीरासारखा दिसणारा तेजपुंज सुंदरसा तरुणही त्या क्हाडा बरोबर होता म्हाळसापती यांच्या शेतात बैलगाड्या मुक्कामी होत्या, जिथे त्यांचे खळं होते, (खळं म्हणजे शेतातील पीक लावणी मळणी करण्याची जागा) सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त होते, तो तेज पुंज तरुण एकटाच खंडोबाच्या मंदिराकडे चालायला लागला असे मानले जाते की खंडोबा स्वतःच त्यां फकिराला हाक मारतो जणू ते त्यांची वाट पाहत होते, जेव्हा तो तेजपुंज तरुण खंडोबा मंदिराकडे चालत येतो तेव्हा त्या सत्पुरुषाची व म्हाळसापतीची भेट होती यावेळी जणू काही सर्व ग्रह एकत्र येतात आणि त्यांना जोडतात. तो तेजस्वी तरुण पुढे सरकताच स्वतः म्हाळसापती स्वंय पूजेचे ताट घेऊन मंदिरातून बाहेर येतात. आणि समोर येऊन म्हणतात "!! या साई !! "त्या दिवसापासून बाबा साई हे नाव स्वीकारतात साईंसोबत रोज एकटे राहणाऱ्या भक्तांमध्ये म्हाळसापतोंचे नाव सर्वप्रथम येते. रोज रात्री साई म्हाळसापती आणि तात्या रात्री उशिरापर्यंत मशिदीत (द्वारकामाई) कुठल्या ना कुठल्या विषयावर भरपूर गप्पा मारत. मग तिघेही तिथेच झोपायचे. कधी-कधी रात्री झोपेतून उठल्यावर म्हाळसापतीना म्हणाले की बाबा वर, "मशिदीच्या छतावर जुन्या खुंट्यांनी टांगलेल्या लांबलचक लाकडी फळीवर बाबा झोपलेले दिसायचे, सात आठ फूट वर, बाबा कधी गेले ? ते कधी खाली आले?" त्याला कोणी खाली येताना पाहिले नव्हते आणि अगदी मनातल्या मनात म्हाळसापती यांनी बाबांना विचारले होते. पुढे बाबांनी ती फळी तोडून टाकली. 1886 साली मार्गशिर्ष पौर्णिमा च्या दिवशी बाबा तीन दिवस ब्रम्हाडी जाण्यापुर्वी म्हाळसापतीना बाबांनी बोलावून घेतले व बोलले माझ्या पार्थिव नश्वर देहाची काळजी घ्या मी त्यांना या विश्वात सोडत आहे. मी नक्कीच तीन दिवसांनी परत येईन, असे म्हाळसापती यांना बाबांनी सांगितलं त्यांच्या भक्तीवर बाबांना अपार विश्वास होता. म्हाळसापती यांच्या मांडीवर डोकं ठेवून बाबांनी श्वास सोडला दोन दिवस बाबांचा श्वास परत आला नाही, तेव्हा त्यांच्या मृत्यूची घोषणा झाली. तिसरा दिवस उजाडला तेव्हा गावात हिंदू-मुस्लिम धर्मगुरू तसेच बाबा विरोधी मंडळी मधील तणाव आणखी वाढला. बाबांचा अंत्यविधी करण्याचा अतोनात प्रयत्न झाला परंतु त्यावेळी म्हाळसापती च्या मागे खंबीर पणे हे महान साईभक्त तात्याबा रामचंद्रदादा, शामा, काशीराम शिंपी या सारखे बरेच साई भक्त उभे राहिले, काही मुस्लिमांनी व बाबा विरोधी मंडळी नी बाबांना जाळून अथवा दफन करण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. पण म्हाळसापतौना पूर्ण विश्वास होता, की बाबांचा शब्द कधीच खोटा होत नाही जोपर्यंत कोपरगाव दरबाराचे (कोर्ट) अधिकारी येत नाहीत; तोपर्यंत मृतदेह कोणाच्याही ताब्यात दिला जाणार नाही असा पवित्रा सर्व भक्तांनी घेतला या वादातच तिसरा दिवस पूर्ण झाला नी बाबांनी डोळे उघडले आणि म्हाळसापतीकडे पाहून म्हणाले, " जात नाही, कोणीही दुनिया पासून दूर चालत"!. खऱ्या भक्तीचा परिचय देऊन म्हाळसापतीने साईबाबांचे मस्तक तथा डोकं तीन दिवस जमिनीवर ठेवले नाही. आणि ते कोणाच्याही हाती दिले नाही. त्याचा विश्वास जिंकला होता. बाबांच्या शब्दांचा विजय झाला होता. बाबांना जिवंत पाहून सर्वं भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर जवळपास 32 वर्ष साई नों या शिडींच्या भूमीवर आपले कार्य केले. आजही भाविक प्रथम श्री खंडोबा च्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व नंतर श्री साईबाबा च्या दर्शनाला जातात जसे प्रथम बाबा खंडोबाच्या दर्शनाला आले होते, तसेच भाविकही सर्वप्रथम खंडोबाच्या मंदिरात येतात. म्हाळसापती फार वयोवृद्ध झाले होते. दृष्टीचें तेज ही मंद झाले होते वृद्धावस्थेमुळे ते चालू शकत नव्हते. पण मुलगा मार्तंडरावा च्या पाठीवर बसून मशीदीत दिवसातून एकदा तरी ते बाबांना भेटायला नक्की येत असत. श्री साईबाबा व श्री म्हाळसापती या दोघांमधील प्रेम सदैव जिवंत होते. ते दोघे ही पुराणकथा व इतर धार्मिक विषयांवर त्यांना चर्चा करायला नेहमीच आवडत होते. आणि त्यामुळे बाबा त्यांचे ऐकायचे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री म्हाळसापती ही अशी एकमेव व्यक्ती होती जी बाबांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावत असत. बाकीचे भक्त ते फक्त मानेवर किंवा छातीवर लावू शकत होते. याचमुळे म्हाळसापती हे एकमेव श्रेष्ठ भक्त होते. श्री साईबाबांच्या आगमनापासून ते त्यांच्या समाधी पर्यंत संपूर्ण साई बाबांचा सहवास त्यांना लाभला अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले. आजही श्री म्हाळसापती हे नाव बाबांशी जोडले जाते. मरण्यापूर्वी त्यांना "मल्हारी महात्म्य एकायचे होते ते ऐकताच त्यांनी प्राणाची आहुती दिली., त्यांचे पुत्र मार्तंडराव यांनी मंदिरातील पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. अशा महान श्री साई परमभक्त म्हाळसापती यांचे मंगळवार १२ सप्टेंबर १९२२ रोजी निधन झाले. अविरत बाबा आणि खंडोबाची सेवा करून भक्तांच्या मनावर उंच स्थान प्राप्त केले. आज त्यांची 102 वी पुण्यतिथी निमित्ताने हा लेख
शब्दांकन - श्री म्हाळसापती यांचे पंतू
संदिप मनोहर नागरे यांनी लिहिलेला आहे.

