shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मारकड कुस्ती केंद्राचा डंकाअठरा वजनगटात प्रथम क्रमांक : चार वजनगटात द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत मारकड कुस्ती केंद्राचा डंका

अठरा वजनगटात प्रथम क्रमांक  : चार वजनगटात द्वितीय क्रमांक 
 इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे, आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती केंद्र या ठिकाणी दि. 9 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत, मारकड कुस्ती केंद्राने वर्चस्व राखीत, एकूण 18 विविध वजन गटात प्रथम क्रमांक, तर चार विविध वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवून, वर्चस्व राखले आहे. 

इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे संस्थापक अमोल तोरवे, राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या. 

 यामध्ये इंदापूर मारकड कुस्ती केंद्रातील, 14 वर्षे वजन गटात प्रथम क्रमांक मिळवलेले, पृथ्वीराज जाधव 35 किलो, यश संतोष मारकड 41 किलो, ऋतुराज सुधीर काळे 48 किलो, हर्षल युवराज मारकड 68 किलो, यशराज श्रावण चोरमले 75 किलो, हर्षद श्रावण चोरमले 57 किलो यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 

 17 वर्षे फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात राजवर्धन संदिपान शेंडगे 45 किलो, समर्थ रामचंद्र पेटकर 55 किलो, सार्थक  संतोष मारकड 71 किलो, समर्थ शत्रुघन शिंदे 80 किलो, अनिकेत आबासो चोरमले तर 19 वर्षे फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये रोहित दिलीप दंगाणे 74 किलो याने प्रथम क्रमांक मिळवला. 
तसेच 17 वर्षे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत तेजस भारत गोफणे ५५ किलो, पृथ्वीराज हनुमंत मारकड 51 किलो, माऊली राजेंद्र कचरे 71 किलो.
19 वर्ष वयोगटात आदित्य सुभाष पिंगळे 63 किलो, विशाल विजय कारंडे 82 किलो, यशराज सचिन जाधव 130 किलो, अवधूत व्यवहारे 67 किलो, गणेश धोंडीराम मासाळ 72 किलो यांनी क्रमांक मिळवले.
         सर्व विजेत्या कुस्तीगीरांना पंचकृष्णा मोबाईल चे प्रोप्रायटर ऍड. मोरेश्वर कोकरे यांच्यातर्फे प्रत्येकी  एक हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
close