shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे डॉ. नेहरकरांचे आवाहन!!

प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-

​सावरगाव घाट, पाटोदा: राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा यांच्या जन्मभूमीतील भगवान भक्ती गडावर आयोजित करण्यात आलेल्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांनी केले आहे.



​डॉ. नेहरकर म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेला हा दसरा मेळावा ऐतिहासिक असणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत.

​'हा मेळावा नसून सामाजिक चळवळ'

​या मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. नेहरकर यांनी स्पष्ट केले की, हा दसरा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, त्याचे मुख्य प्रयोजन समाजातील उपेक्षित, शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ निर्माण करणे आहे. त्यामुळे हा केवळ मेळावा नसून, एक सामाजिक चळवळ आहे.

​या सामाजिक चळवळीसाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वच जातीतील समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे नेते डॉ. वासुदेव नेहरकर, भगवानराव केदार, राहुल गदळे, सुनील घोळवे, महादेव जाधवर , प्रकाश मुंडे, सचिन कराड संतोष चौरे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी केले आहे.

close