शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
📜 धार्मिक बातमी
शिर्डी शहरात उत्साह-उत्सवाच्या वातावरणात श्री गणेशाची महाआरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. या मंगल सोहळ्याचे औचित्य सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ पगारे आणि सौ. संगीता पगारे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन, तसेच ऋषिकेश पगारे, आरती पगारे, रेशमबाई मोरे, सोयल शेख यांसह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशभक्तांच्या जयघोषात आणि मंगल वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत झाले.
🪔 या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीने झालेली सुंदर आरती आणि श्रद्धाळूंनी घेतलेला गणरायाचा दर्शन लाभ. गणेशोत्सवाचे औचित्य साधत हा सोहळा शिर्डीकरांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.
000