shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात 'शिक्षक कॉलनी' भागात एकाच रात्री चार घरफोड्या!


​पोलिसांनी २४ तासांत चार आरोपींना  ठोकल्या बेड्या; पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व पथकाची मोठी कामगिरी!!!

​प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:- केज येथील शिक्षक कॉलनी परिसरात चोरट्यांनी हैदोस घालत एकाच रात्री चार घरे फोडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांच्या आत चार आरोपींना 



 बेड्या ठोकून चोरीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि त्यांच्या पथकाच्या या जलद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​नेमकं काय घडलं?

​केज शहरातील प्रतिष्ठित असलेल्या शिक्षक कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंद असलेल्या चार घरांना लक्ष्य केले. घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पञकार प्रकाश मुंडे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची तत्परता

घरफोडीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास पथक तयार केले. त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपासाच्या आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस तासांच्या आत एका आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

​​पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून घरफोडीतील  इतर आरोपींची नावे व  त्याने इतर गुन्ह्यांचीही कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र केला आहे.

​पोलीस निरीक्षक उनवणेंचे अभिनंदन

​पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात सहभागी असलेल्या सर्व अंमलदारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील नागरिकांनी व शिक्षक कॉलनीतील रहिवाशांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षक कॉलनी भागात सतत होत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे या भागातील गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्याकडे केली आहे.

close