अहिल्यानगर
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी रात्रंदिवस संघर्ष करून शासनाकडून विविध जीआर, नियम, कायदे, रूल्स आणि गॅझेट्सच्या माध्यमातून सामाजिक न्याय मिळवून देणारे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी समाजाचे निष्ठावंत मार्गदर्शक जनाब मोहतरीन शब्बीर अहमद अन्सारी साहेब यांच्या तब्येतीत आता सुधार दिसून आला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना गंभीर आजारामुळे मुंबई येथील प्रसिद्ध टाटा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयीची बातमी जशी चाहत्यांपर्यंत पोहोचली, तसे देशभरातील ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र अल्लाह रब्बुल इज्जत व परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या तब्येतीत सुधार झाल्याने त्यांना टाटा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आता जालना येथील राहत्या घरी विश्रांती घेत आहेत.
त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ अर्पण केला आणि प्रार्थना केली. या भेटीत त्यांच्या समाजकार्याच्या अथक वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या बातमीने भारावून महाराष्ट्रातील अनेक समाजप्रेमी व राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जालना येथे दाखल झाले. त्यामध्ये महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार अबू आझमी, आमदार कपिल पाटील, हर्षद सिद्दीकी, माजी आमदार महादेव जानकर, बागवान समाजाचे मार्गदर्शक हाजी जब्बार बागवान, शिक्षणतज्ज्ञ हाजी रफिक बागवान, सोलापूर येथील इसहाक खडके यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकारी यांनी भेटी देऊन आपुलकी व्यक्त केली.
शब्बीर साहेब यांच्या दीर्घकालीन समाजकार्यामुळे ते ओबीसी समाजाच्या प्रत्येक घराघरात एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. शिक्षण, नोकरी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात ओबीसींना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला संघर्ष आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आज त्यांची प्रकृती सुधारत असल्याची बातमी ऐकून ओबीसी समाजामध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांचा एकच आवाज आहे —
"साहेब, आगे बढ़ो... हम तुम्हारे साथ हैं!"

