shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या गणरायाच्या आरतीसाठी गोंदकर पाटील बांधवांची उपस्थिती


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
धार्मिक बातमी

साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती शिर्डीतील भानुदास गोंदकर,ॲड. जगन्नाथ गोंदकर, राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर,माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर,गणेश कारखान्याचे प्रतापराव जगताप, शिर्डी नगरपरिषदेचे गटनेते अशोक गोंदकर,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, अरविंद आप्पा कोते,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर,अर्जुन  जगताप, विलास कोते,प्रकाश गोंदकर, विनोद गोंदकर यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली 
यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला 

याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यातल्या एम्प्लॉइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच अधिवेशन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित केले असून साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने तसेच राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्ववान चेअरमन मधे बेस्ट चेअरमन ऑफ द एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पहिली निवड ही चेअरमन विठ्ठल पवार यांची झाल्याने माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चेअरमन  विठ्ठल पवार यांचा सत्कार करत त्यांना शुभेछा देण्यात आल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अँड जगन्नाथ गोंदकर,सचिन तांबे,गोंदकर ताई व दीपक गोंदकर यांनी आपली मनोगते व्यक्त करतांना साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे कार्य चेअरमन विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी सुरू असून उत्तरोत्तर संस्थेची अशीच प्रगती होवो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली.
यावेळी व्हाईस चेअरमन पोपटराव कोते संचालक राम गागरे मिलिंद दुनबळे रवींद्र गायकवाड तुळशीराम पवार सचिव विलासराव वाणी विजय शिंदे नवनाथ थोरे भगवानराव थोरात दिलीप सुपेकर ज्ञानेश्वर तुरकणे नानासाहेब थेटे रमेश वाघे सुनील चिकणे राजेंद्र खर्डे अजित जगताप व पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close