shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्रीच्या शुभ पर्वावर स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये " जल्लोषात गरबा नाईट महोत्सव" संपन्न

वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड या शाळेमध्ये नुकताच नवरात्रीच्या शुभ पर्वावर " गरबा नाईट महोत्सव" उत्साहामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाला वरुड वासियांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड ही शाळा दरवर्षीच नवरात्रीच्या शुभपर्वावर " गरबा नाईट" चे आयोजन करत असते. 

यावर्षी सुद्धा पालकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये आणि सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निनाद गव्हाळ तसेच परीक्षक म्हणून प्रिती महात्मे या लाभल्या होत्या तसेच पी.टी.ए.मेंबर्स अंशुमन मानकर स्पाॅंसर्स दैनिक वरुड केसरी वृत्तपत्र समृह.श्री पवन गांधी,अवनी यावलकर, डॉ.रवि निळकंठराव यावलकर, श्री. नरेश गोडबोले, श्री. सागर मालपे या सर्व पाहुण्यांच्या हस्ते दुर्गा मातेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत कुमार दुबे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून पाहुण्यांपुढे ठेवला सोबतच आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करुन नवरात्री उत्सवाच्या उपस्थितांना तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणी शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांना हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेचे संगीत शिक्षक सचिन चौधरी,अर्पणा भागवतकर, स्वाती निकम त्याचप्रमाणे रितुल देशमुख, सात्विक चौधरी, वंश सातव,ओम पटेल,ओम खेरडे,नैतिक काळे, यांनी दुर्गामातेच्या आरती सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गरबा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर आलेल्या सर्व "गरबा प्रेमी" आणि सहभागी इच्छूक यांचा क्रमानुसार गरबा घेण्यात आला. प्रत्येक गृप ला १५  मिनिटे देण्यात आली होती त्यामधून परीक्षकांनी परिक्षण करुन शालेय विद्यार्थ्यांच्या गृप मधून इयत्ता दहावी 'अ' च्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नृत्य म्हणून रोख पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात  आले तर खुल्या गटामधून कोमल मेंघानी प्रथम तर निकिता खुटाटे द्वितीय तसेच मोना अनासाने यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.त्याचप्रमाणे प्रज्ञा मानेकर,प्रिया मेघांनी, श्री. गणेश जाधव,मनिषा वानखडे यांना  प्रमुख पाहुण्यांचा हस्ते उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्वाती निकम,अर्पणा भागवतकर यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना ही शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनीतकुमार दुबे तसेच उपमुख्याध्यापिका रिया तिडके यांची होती परंतु त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे काम शाळेचे  प्रशासन अधिकारी सुशील उघडे, शैक्षणिक समन्वयक रुपाली काळे, अकाऊंट अमोल कोल्हे, कलाशिक्षक कपिल तरार, मयूर पळसकर,संगीत विभाग, संगणक विभाग, क्रीडा विभाग ॲडमिशन काॅन्सिलर गौरी नेरकर तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, स्टुडंट्स काऊन्सिल मेंबर्स यांनी केले. यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला व वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर
 (वरुड जि. अमरावती)

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close