निरनिमगाव येथे मुख्याध्यापक बाळासाहेब गरगडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
लोकमत न्यूज नेटवर्क बावडा: निरनिमगाव येथील अनंतराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जालिंदर गरगडेयांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात(दि. 19 मे ) पार पडला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गरगडे सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांच्या पत्नी सारिका भरणे,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सो, आप्पासाहेब जगदाळे,अंकिता पाटील–ठाकरे , श्रीमंत ढोले सर, हनुमंत कोकाटे,श्रीराज भरणे , रामराव पाडुळे, जगन्नाथ पाटील, प्रतापराव पाटील , किरण पाटील, शिवाजी मोहिते व इतर अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून गरगडे सरांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे व उपाध्यक्ष रणजीत घोगरे यांनी त्यांच्या मनोगतात गरगडे सरांच्या 34 वर्षाच्या सेवेचा उल्लेख करत त्यांच्या कामगिरीचे वर्णन केले .
तसेच सरांनी शाळेमध्ये राबलेल्या उपक्रमातून शाळेचा कसा विकास झाला याबद्दल ही अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला.
कार्यक्रमाची सुरुवात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेब गरगडे सरांनी अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण रुजविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
----------------------
, “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. बाळासाहेब गरगडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य निश्चितच आदर्शवत आहे - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.
---------------------------
गरगडे सरांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा व विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा विशेष उल्लेखनीय आहे - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील .
--------------++++
यावेळी बाळासाहेब गरगडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात गरगडे सरांनी सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे आभार मानत आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम भावनिक वातावरणात तसेच उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडला.
------------------
फोटो ओळ: निरनिमगाव (ता. इंदापूर)येथील अनंतराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जालिंदर गरगडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

