shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची निवड

शिर्डीतील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाला संधी; राज्यभरातून होत आहे कौतुकांचा वर्षाव..! 

नगर प्रतिनिधी :
        आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शिर्डी येथील कर्तव्यनिष्ठ पत्रकार श्री. तुषार संजय महाजन यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांची कार्यतत्परता विचारात घेऊन संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी एकमताने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

         श्री. महाजन यांनी आपल्या निर्भीड पत्रकारितेतून त्यांनी जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
या निवडीनंतर बोलताना संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तुषार महाजन हे एक अभ्यासू, निष्ठावान आणि समाजनिष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होईल आणि संघटनेची ताकद निश्चितच वाढेल.
शिर्डीच्या मातीतून घडलेल्या आणि सामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या श्री. तुषार महाजन यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
         यावेळी श्री. तुषार महाजन यांची ही निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अढांगळे, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजुमले व प्रितमसिंग चौहान, अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष दत्ता पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज बाबा वाघ आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडीचे स्वागत करत श्री. महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राज्यभरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
close