“हा सन्मान माझ्या कार्याला अधिक बळ देणारा आहे. पुढील काळातही समाजहिता साठी निस्वार्थपणे काम करत राहीन.”.. श्री.राजधर महाजन.
पुणे, १२ ऑक्टोबर — एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता राजधर महाजन यांचा “राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता” म्हणून बहुमान करण्यात आला आहे. हा गौरव पुणे येथील ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह यांच्या तिसऱ्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आला. या अधिवेशनाचा आयोजन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा, पुणे येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते, माहिती अधिकार कायद्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार राजधर महाजन यांना प्रदान करण्यात आला.
शिर्डी एक्सप्रेस साप्ताहिक/लाईव्ह च्या टीम कडून हार्दिक अभिनंदन...