अहिल्यानगर – दै. लोकमतच्या संपादकीय मंडळाची महत्वाची बैठक निवासी संपादक सुधीर लंके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीत अशोक सब्बन, प्रा. सुधाकर शेलार, प्राचार्य अरुण तुपविहिर, प्रा. प्राजक्ता ठुबे, भाजप मंडल अध्यक्ष C. A. ज्ञानेश्वर काळे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तसेच उपसंपादक सुदाम देशमुख यांसह संपादकीय मंडळातील मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत लोकमतच्या भविष्यातील दिशा, लोकहिताशी निगडित विषयांवरील लेखन धोरण आणि समाजजागृतीसाठी माध्यमांची जबाबदारी यावर सखोल विचारविनिमय झाला. चर्चेतून अनेक नवे संकल्प उदयास आले असून, मंडळाने गुणवत्तापूर्ण पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
🌟 या बैठकीतून लोकमत परिवाराने पुन्हा एकदा “जनतेचा आवाज बनण्याचा” संकल्प पुनः उच्चारला.
०००