पुणे (प्रतिनिधी): आज पुणे येथे राज्यातील आरक्षण या महत्वाच्या विषयावर पुणे येथील मार्केट यार्ड येथील राज्य मजूर फेडरेशन ऑफीसमध्ये एक भव्य सभा संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेते, उद्योगपती, अधिकारी, तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य सहकारी संघाचे चेअरमन आणि गृहनिर्माण व समुह पुनर्विकास मंत्री आदरणीय प्रविणजी दरेकर साहेब यांनी भूषविले. त्यांच्या सोबत राज्य व राष्ट्रीय मजूर फेडरेशनचे चेअरमन आदरणीय संजयजी कुसाळकर साहेब आणि कोल्हापूर मजूर फेडरेशनचे चेअरमन तसेच राज्य मजूर फेडरेशनचे संचालक आदरणीय मुकुंदरावजी पवार , लक्ष्मण धोत्रे, नाशिक ,पुण्याचे उद्योजक रमेश शिंदे, मनसेचे नेते सातपुते, सोलापूरचे उद्योजक मनोहर मुधोळकर, भटक्या विमुक्तांचे नेते वसंतराव गुंजाळ,धुळे चिपळूण चे उद्योजक सुरेश पोवार, रमेश जेठे,शाम विटकर ,महादेव मंजूळकर, ज्रगन्नाथ पोवार, रॅपनवाड, कुसमुडे,हे विशेष मान्यवर उपस्थित होते.
सभेत आरक्षण विषयावर सखोल चर्चा झाली. प्रविण दरेकर साहेब यांनी आरक्षणाची मागणी ही भक्कम पुराव्यांच्या आधारावर सरकारसमोर मांडण्याचे महत्व पटवून दिले. त्यांनी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.व मी वडार समाजाच्या हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.त्यामुळे वडार समाजाच्या आशा पल्लवित झाल्या.
राज्यभरातील अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या विषयावर एकत्र आले. काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या मान्यवरांनाही पुढील बैठकीत सहभागी करून घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. लवकरच या विषयावर अधिक ठोस आणि संघटित पद्धतीने पुढाकार घेण्यात येणार आहे.
या सभेमुळे वडार समाजासह आरक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व घटकांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. समाजाच्या प्रगतीसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी एकत्रित प्रयत्नांची नवी दिशा या सभेतून मिळाली.
००००