shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेळगाव येथे केंद्रस्तरीय विद्यार्थी व शिक्षक यांचे मराठी साहित्य संमेलन गौराईमळा शाळेत उत्साहात संपन्न*

*शेळगाव येथे केंद्रस्तरीय विद्यार्थी व शिक्षक यांचे मराठी साहित्य संमेलन गौराईमळा शाळेत उत्साहात संपन्न*
  इंदापूर:  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौराईमळा, केंद्र : शेळगाव या  ठिकाणी पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्या एक अभिनव उपक्रमापैकी असणारा विद्यार्थी व शिक्षक यांचे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 
        त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शेळगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप, गौराईमळा शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र समन्वयक प्रताप शिरसट व महिला शिक्षिका सुवर्णा क्षीरसागर , सुरेखा फुले , वैशाली जाधव व निर्मला भुजबळ यांच्या हस्ते करुन संमेलनाची सुरुवात केली. 
      आजच्या या मराठी साहित्य संमेलनामध्ये हस्ताक्षर स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. केंद्र समन्वयक प्रताप शिरसट यांनी आजच्या मराठी साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक केले.
    ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की, ग्रामपंचायत शेळगाव परिसरातील शाळा भौतिक सुविधांनी व शैक्षणिक गुणवत्तेने समृद्ध होण्यासाठी शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या समन्वयातून तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळांचा विकास करणार आहोत. लवकरच शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा, तसेच सोलर विद्युत पॅनल या सुविधा मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
    आज विद्यार्थी आणि शिक्षक यांचे मराठी साहित्य संमेलन हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला आहे, तो अत्यंत स्तुत्य आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणारा आहे, असेही त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
    आजच्या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी  नैपुण्य प्राप्त केले.
हस्ताक्षर स्पर्धा ( इयत्ता १ ली ते ३री गट ) प्रथम क्रमांक : क्षितिज शितल बेदमुथा (तेलओढा ) , द्वितीय क्रमांक : समीर रंगनाथ वाघमोडे ( महादेवनगर ), तृतीय क्रमांक : अलिशा हुसेन शेख ( गोतोंडी )
हस्ताक्षर स्पर्धा ( इयत्ता ४थी व ५ वी गट ): प्रथम क्रमांक : प्रतिभा अमोल जगताप (तेलओढा ), द्वितीय क्रमांक : श्रद्धा सतीश कांबळे (गोतोंडी ), तृतीय क्रमांक: कल्याणी शेखलाल शिंदे (महादेवनगर ) कथालेखन स्पर्धा : प्रथम क्रमांक: रुद्र प्रकाश आटोळे ( शेळगाव ), द्वितीय क्रमांक : ओवी चेतन जाधव ( गोतोंडी ), तृतीय क्रमांक : प्रणाली तानाजी राऊत ( राऊतननवरे मळा या विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केले. नैपुण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना गौराईमळा शाळेच्या वतीने वही आणि पेन बक्षीस म्हणून देण्यात आले.
     आजच्या या साहित्य संमेलनास तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे, शिंगाडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक संजीवकुमार केसरे, कडबनवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब साबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विकास दराडे, संचालक सतीश गावडे, शिक्षक अनिल वाघमोडे, अण्णासाहेब करळे, नंदकुमार जाधव उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेलओढा शाळेचे आदर्श मुख्याध्यापक परशुराम मोहिते सर यांनी केले तर आभार राऊतननवरेमळा शाळेच्या आदर्श शिक्षिका सुरेखा फुले मॅडम यांनी मानले.
close