अकोला प्रतिनिधी:-
अकोला विभागाचे सहाय्यक संचालक( हिवताप) मा.डाॅ. हरी पवार सर यांचे दालनात महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. न.२९३४ या संघटनेची शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. मा.पवार संरानी सहाय्यक संचालक आ. से. (हि) अकोला या पदाचा कार्यभार घेतल्यानंतर संघटनेची ही पहिलीच सभा असल्याने संघटनेतर्फे राज्य सरचिटणीस श्री डी. एस. पवार,जिल्हा कार्याध्यक्ष श्री एस. सी. माणिकपुरे, श्री.दिलीप देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवुन त्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यानंतर प्रस्तावित मागण्यावर चर्चा करण्यात आली.
यामध्ये सर्वात महत्वाचा व संवेदनशील मागणी सेवेचे ३० वर्षानंतर तिसर्या कालबद्ध पदोन्नतीचे लाभ. दिनांक २४सप्टेंबर २०२५ ला
मा.डॉ. शशिकुमार वाकचौरे उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांची भेट घेवून प्रस्तावित मागण्यावर विस्तृत चर्चा केली. नुकतेच मा. उपसंचालक पदावर हजर झाले असल्याने त्याची शहानिशा करून प्रस्तावित मागणीबाबत प्रशासनाची सकारात्मक भुमिका राहील अशी शाश्वती दिली होती तथापि अद्यापर्येत काहीच कार्यवाही झाली नसल्याचे बाब चर्चेमध्ये श्री डी. एस. पवार यांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी यावर खुलासा केला की विभागाचा ३५ कर्मचार्यांचा प्रस्ताव तयार केले आहेत.पण मा. सहसंचालक आरोग्य सेवा ( हि. ह. व जरो) पुणे यांना याबाबत मार्गदर्शन मागितले असता त्यांनी शासनाचे दि.११ एप्रिल २०२३ चे पत्राप्रमाने शैक्षणिक पात्रता व विहित अहर्ता धारण करणार्यांनाच तिसरा लाभ मंजूर करण्याबाबत निर्देशित केले असल्याने प्रस्ताव थांबविले असल्याची माहिती त्यांनी चर्चेत दिली. परंतु शासनाचे याच पत्रामधिल वित्त विभागाचे दि. २/०३/२०१९ व ७/१०/२०२२ चे शासन निर्णयानुसार नागपूर, नाशिक,कोल्हापुर,लातुर ,संभाजीनगर व ठाणे विभागामधिल सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचार्यांना तिसरा लाभ मंजूर केले असल्याचे आदेशासह त्यांचे निदर्शनास आणून दिले. याबाबत मा. उपसंचालक यांचेशी चर्चा करून प्रशासनाची सकारात्मक भुमिका राहील अशी शाश्वती दिली.
त्यानंतर अकोला विभागातील आरोग्य निरिक्षक पदावरील पदोन्नती प्रकरणाबाबत चर्चा केली.या संघटनेच्या मागिल चर्चेनुसार अधिपत्याखालील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून ज्येष्ठतेनुसार २० कर्मचार्यांची माहिती मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक जेष्ठतेनुसार ज्या कर्मचार्याची पदोन्नती साठी माहिती मागविण्यात आली त्यामधील २ कर्मचारी १० वर्षापासून सेवेतून गायब आहेत. २ कर्मचार्याची ५-५ वर्षाची सेवा खंडीत आहे. ही बाब संघटनेकडून त्यांचे निदर्शनास आणून दिली. तसेच पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाचे १ऑगष्ट २०१९ शासन निर्णयानुसार मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली आहे.त्यामध्ये १सप्टेंबरला रिक्त असलेली पदे व पुढील १वर्षात रिक्त होणार्या पदाची संख्या विचारात घेवून निवड सुची तयार करणे आवश्यक आहे.त्यानुसार अकोला विभागामध्ये १सप्टेंबर २०२५ रोजी पदोन्नती कोट्यातील १० पदे रिक्त आहेत.पुढील एक वर्षात सेवानिवृत्ती १७ व वरिष्ठ पदावरील पदोन्नतीने रिक्त होणारी पदे लक्षात घेता जवळपास ३० पदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे .
निवडसुची करिता जेष्ठतेनुसार किमान ६० कर्मचार्यांचे प्रस्ताव तयार करणे आवश्यक असल्याचे संघटनेकडून प्रशासनाचे निदर्शनास आणून दिले. त्यावर जे कर्मचारी बर्याच वर्षांपासून गायब आहेत त्याचेवर केलेली कार्यवाही व त्यांची नावे पदोन्नती प्रक्रियेतुन वगळण्यात येवुन फेर प्रस्ताव मागविण्यात येईल .तसेच क्षेत्र कर्मचार्याची आरोग्य कर्मचारी पदावरील पदोन्नती , वेतन त्रुटी समितीचे शिफारशी प्रमाणे २ जुन २०२५ चे शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरिक्षक, आरोग्य पर्यवेक्षक व अवैद्यकीय आरोग्य अधिकारी या संवर्गाचे नवीन वेतन श्रेणीत फेर वेतन निश्चिती करुन कालबद्ध पदोन्नतीचे प्रकरणासह सर्व लाभ सेवानिवृत्त व सेवेतील कर्मचार्यांना मंजूर करण्यात यावे. सेवानिवृत्त कर्मचार्याचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढने, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे स्तरावरील प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी संबंधित कार्यालयाला निर्देश देण्यात यावे. याबाबत संघटनेने आग्रही भूमिका घेतली.
यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल अशी शाश्वती चर्चेत प्रशासनाने दिली.
मा. उपसंचालक बाहेर गावी दौर्यावर असल्याने मुख्य प्रशासकीय अधिकारी खडसे मॅडम यांचेशी चर्चा केली. प्रस्तावित मागण्यावर प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेण्याची शाश्वती दिली त्याबद्दल संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले..
आजच्या बैठकीत संघटनेचे शिष्टमंडळामधे प्रदेश सरचिटणीस श्री. डी.एस.पवार,डाॅ.एस. सी.माणिकपुरे, श्री दिलीप देशमुख, श्री संसारे,अब्दुल जावेद आदी पदाधिकारी उपस्थित होते
डी एस पवार सरचिटणीस