वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) :
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री, राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना १५०व्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील वाळकी येथे तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते . एकता दौड मध्ये शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला .
येथील न्यु इंग्लिश स्कूल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्राच्या एकता व अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते , पत्रकार ज्ञानदेव गोरे , उद्योजक संदीप जाधव , उपप्राचार्य भरत कासार , युवा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राम कासार , सागर कासार यांच्या हस्ते देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आला .
विद्यालयातील प्रांगणातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एकता दौड यास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते , भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला . विद्यालयातील सुमारे चौदाशे विद्यार्थ्यां सह शिक्षकांनी एकता दौड मध्ये सहभाग घेतला . विद्यालयापासून निघालेली एकता दौड गावातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील मुख्य चौकापर्यंत आली . गावात आलेल्या एकता दौड मध्ये ग्रामस्थांनी उस्तफुर्तपणे सहभाग घेतला .
यावेळी बोलताना दिलीप भालसिंग म्हणाले की , सरदार पटेल यांच्या दृढ नेतृत्वगुणांनी आणि इच्छाशक्तीने देशातील असंख्य संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, कार्यनिष्ठा आणि दूरदृष्टीमुळे भारत आज एकसंघ, सशक्त आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे .
उपप्राचार्य भरत कासार, पर्यवेक्षक प्रदीप गारुडकर, शिक्षक रमेश काळे,एकनाथ कासार, संतोष झावरे, संतोष भालसिंग, प्रकाश मुनफन, शहाजी काळे, कृष्णा रोहकले,भगवंता रेंगडे,भारती मगर, रोहिणी चोभे, सोनाली पाटकुलकर,सुनंदा दळवी, सविता जावळे,रियाज शेख, अविनाश चौरे, रईसा तांबोळी, कैलास खणकर,माया चव्हाण, नंदा खोब्रागडे,भाऊसाहेब कासार तसेच तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्या नियोजनातून एकता दौड पार पडली .
अखंड भारतासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या दिवशी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले . सरदार वल्लभभाई पटेलांच्या आदर्शावर चालत 'एक भारत, श्रेष्ठ भारत' घडविण्याचा संकल्प करण्यासाठी वाळकीमध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने ऐकता दौडचे आयोजन केले . एकता दौड मध्ये विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला .
( प्रल्हाद गीते , सहाय्यक पोलीस निरीक्षक )

