shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बालिकेवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा मिळावी,अहिर सुवर्णकार समाजाची मागणी.

बालिकेवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा मिळावी,अहिर सुवर्णकार समाजाची मागणी.

प्रतिनिधी
- एरंडोल अहिर सुवर्णकार समाजातर्फे मालेगाव तालुक्यातील एका गावातील बालिकेवर एकाने अमानुष अत्याचार करुन तिची निर्घुणपणे हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणी साठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.सदर निवेदन हे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व तहसीलदार प्रदिप पाटील यांना देण्यात आले.

     दरम्यान मालेगाव तालुक्यातील एका गावातील ४ वर्षीय बालिकेवर विजय खैरनार याने अमानुष अत्याचार करुन तिची निर्घुणपणे हत्या केली.याबद्दल एरंडोल येथील अहिर सुवर्णकार समाजातर्फे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला व निवेदन देण्यात आले निवेदनात सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी असून यामुळे पालक वर्गात घबराट निर्माण झाल्याचे म्हटले असून आरोपी विजय खैरनार यास जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी,आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा व्हावी,यासाठी विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी व बालिकेच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य खचलेले असुन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.

        याप्रसंगी अध्यक्ष जगदीश मोरे,उपाध्यक्ष विकास पिंगळे,युवासेना जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,मुकेश विसपुते,ॲड.विलास मोरे,पौर्णिमा देवरे,महेश देवरे, शितल विसपुते,रामदास पिंगळे,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,सुभाष बिरारी,सचिन वानखेडे,लोकेश बाविस्कर,मुकेश सोनार,विशाल सोनार, भुषण सोनार, रत्ना देवरे, सुवर्णा पिंगळे,रेखा वाघ,हिराबाई मोरे,संगीता जाधव व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

close