shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू.

एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

एरंडोल-पारोळा मार्गावर अपघातांची मालिका कायम,चुकीच्या हायवेच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप.

प्रतिनिधी - एरंडोल - पारोळा रस्त्यावर आज गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. मागुन येणाऱ्या डंपरने धरणगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी शिवाजी रघुनाथ महाजन वय ४२, रा.अष्टविनायक कॉलनी एरंडोल यांना जोरदार धडक दिली.त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

           याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार शिवाजी महाजन हे एरंडोल - पारोळा महामार्गावरील रघुवीर समर्थक बैठक हॉलसमोर मॉर्निंग वॉक करुन परत येत असताना पारोळ्याकडून त्यांच्या मागून भरधाव वेगाने आलेल्या रिकाम्या डंपर एच.आर. ३८ ए.डी. ४१३६ ने त्यांना जोरदार धडक दिली.या भीषण धडकेत डंपर चे चाक अक्षरशः त्यांचा अंगावरून गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रसंगी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी सदर घटना बघितली व त्यांनी लागलीच एरंडोल पोलीस ठाण्यात फोन करून कळवले.यादरम्यान अपघात ग्रस्त डंपरचा चालक डंपर तसेच चालू ठेवून पळून गेला.अपघाताची माहिती मिळताच एरंडोल शहरात मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. राजू पाटील, अमोल भोसले आणि विजू पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले.मयत शिवाजी महाजन यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.ज्या डंपरमुळे हा अपघात झाला, ते डंपर एरंडोल-धरणगाव रस्त्याचे सुरू असलेल्या कामासाठी मुरूम वाहतूक करत असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली. एरंडोल शहरातील नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निकृष्ट दर्जाच्या आणि अपूर्ण हायवेच्या कामामुळे आजवर एरंडोलकरांनी २० ते २५ जणांचा जीव गमावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सततच्या अपघातांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. फरार डंपर चालकाचा एरंडोल पोलीस कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये फरार डंपर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.दरम्यान मयत शिवाजी महाजन व त्यांचे सहकारी हे धरणगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जात होते परंतु सध्या त्याचे काम सुरु असल्याने ते पारोळा महामार्गावर फिरायला जात असल्याचे समजले.महाजन हे धरणगाव येथे तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.संध्याकाळी सहा वाजता पारोळा येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

close