shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ !!!समाजसेवक, कवी, लेखक उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मतदान आपला जन्म सिद्ध अधिकार आहे, लोकशाही चा आधारस्तंभ आहे, हा अधिकार   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय  संविधान मार्फत मतदार करायचा अधिकार व निवडणुकाचे अधिकार दिले आहे.सर्वांत महत्त्वाचे दान म्हणजे मतदान आहे. गरीब असो किंवा श्रीमंत व्यक्ती असतो सर्वांना सारखा अधिकार दिला आहे, मतदान व निवडणूक लोकशाही पद्धतीने होऊ द्या.लोकशाही वाचवा, संविधान वाचवा तरच सक्षम व भक्कम होईल हेच आताचे राजकीय पक्ष व सरकारने विचार करावा.

 आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. या भारत देशात निवडणूक मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे हाच लोकशाही पद्धतीतिचा घटक असतो. तोच उमेदवारी अर्ज निवडणूक मध्ये अचानक कसा काय बाद होतो, किंवा त्या उमेदवाराला पैसाचे आमिष  दाखवून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो, शिवाय अर्ज मागे घेणार नाही तर खोट्या गुन्हा दाखल करून आयुष्य बरबाद करायची धमकी दिली जाते. आपला भारत देशाची हीच लोकशाही आहे का, सत्तेवर असलेले नेते सत्तेचा व पदाचा गैरवापर करून निवडणुका फक्त कागदावर दाखवून घेत आहे. हे जगजाहीर सिद्ध झाले आहे.

सत्ताधारी पक्ष व नेते यांनी स्वतः पुढे निवडणूकाना समोर जाऊन लोकशाही पद्धतीने मतदान प्रकिया मध्ये स्वतः भाग घेऊन सिद्ध करायची एक यवस्था निर्माण केली आहे.सत्तेचे मस्ती व पैशाची गुर्मी एक दिवस लोकशाही पद्धतीने लोक रस्तावर येऊन उतरवणार हे लक्षात ठेवावे, कारण आपली हुकुमशाही जनता संपवणार हाच भारत देशाचा इतिहास आहे. सत्ता कोणाची असो लोकशाही अर्थ तोच आहे.सत्ताधारी व नामधारी यांनी गर्व करू नये. एक दिवस असा येणार तर तुमची सत्तेला नक्की  सुरंग लागणार आहे. त्याचा करता निवडणुका बिनविरोध होऊन स्वतःला राजा समजू नका. जो लोकांना समोर जातो तो खरा राजा असतो.

 मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. आणि भारताच्या राजकीय परिदृश्याला आकार देण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते.हे नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार वापरण्याची परवानगी देते.मतदानाद्वारे, व्यक्तींना त्यांच्या निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कृती आणि धोरणांसाठी जबाबदार धरण्याची शक्ती असते.मतदानामुळे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित होते, ज्यामुळे सामाजिक आणि राजकीय समानता वाढते.

लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे सरकार स्थापन करण्यास मदत करते.मतदानाद्वारे, नागरिकांना विविध मुद्द्यांवर त्यांचे मत मांडण्याची आणि देशाचा विकासात योगदान देण्याची संधी मिळते. मतदानामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना सक्षम बनते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये आपले मत मांडता येते.हे जबाबदार आणि प्रतिसाद देणाऱ्या सरकारच्या वाढीला प्रोत्साहन देते, कारण निवडून आलेले प्रतिनिधी त्यांच्या घटकांच्या चिंता सोडवण्याची शक्यता जास्त असते.

मतदानाची उच्च टक्केवारी लोकशाही व्यवस्थेची वैधता आणि विश्वासार्हता मजबूत करते.मतदान हा केवळ अधिकारच नाही तर एक नागरी कर्तव्य देखील आहे आणि तो वापरुन व्यक्ती लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होतात आणि देशाच्या एकूण प्रगतीत योगदान देतात.
close