प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
गेली ५० वर्षे अंबाजोगाई शहरासाठी अहोरात्र तळमळणारे, लाखो रुग्णांचे जीव वाचवणारे आणि पडद्यामागे राहूनही खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेले समाजसेवक, भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा हे अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उभे राहिल्यास, ते या शहरातील जनतेचे भाग्य ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
काकाजींनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांना निवडून आणण्यासाठी आणि समाजसेवेसाठी वेचले आहे. त्यांच्या कामाची धडाडी आणि निस्वार्थ वृत्ती यांमुळे ते विरोधकांमध्येही विश्वासाचे स्थान मिळवून आहेत.
रुग्णसेवेतील 'देवदूत' आणि अजातशत्रू नेता
लाखो रुग्णांचे जीवनदान: काकाजींनी अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलेली अहोरात्र मदत, यामुळे त्यांना रुग्णसेवेतील 'देवदूत' मानले जाते. रुग्णालयातील कामाची खात्री विरोधकांनाही आत्मविश्वासाने सांगणारे ते एकमेव समाजसेवक आहेत.
'घर ना घर' आणि 'गल्ली ना गल्ली'ची ओळख: अंबाजोगाई शहरातील प्रत्येक घर, प्रत्येक गल्लीची त्यांना अचूक ओळख आहे. शहराची 'नस' ओळखणारा हा जाणकार नेता प्रत्येक सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असतो.
सर्व जाती-धर्मातील सलोखा: सर्व जाती-धर्मातील लोकांसोबत त्यांची जिव्हाळ्याची मैत्री आहे. जेष्ठ नागरिकांपासून ते तरुणाईपर्यंत सर्वांशी त्यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
संवादाची व्यापकता: बुद्धिवंत लोकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसोबत ते सहजपणे संवाद साधतात.
संकटात धावून येणारे 'काकाजी': सुख-दुःखात सर्वप्रथम धावून येणारे, कार्यकर्त्यांसाठी जीवाला जीव देणारे आणि त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमांत स्वतः कायम उभे राहणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
जनता देणार ५० वर्षांच्या सेवेला न्याय?
ज्या माणसाने आपले संपूर्ण उभं आयुष्य इतरांसाठी वेचले, आणि या वयात जर स्वतःसाठी मत मागितले, तर मला वाटत नाही की कोणाची विरोधात मत देण्याची नैतिकता होईल.
अंबेजोगाई नगरपरिषद निवडणूक मध्ये विश्वासक चेहरा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा यांना जनतेने संधी दिल्यास अंबाजोगाई शहराचा विकास नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

