shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

​ केजच्या 'क्रीडा दीपस्तंभा'चा गौरव! प्रा. विनोद गुंड पाटील यांच्या कार्याचा वाढदिवसानिमित्त सन्मान!



प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी 

​ केज तालुक्यात क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, प्रा. विनोद चंद्रकांत गुंड पाटील यांच्या कार्याचा गौरव क्रीडा क्षेत्रात होत आहे. विजय स्पोर्ट्स अकादमीचे संस्थापक आणि केज तालुका क्रीडा संयोजक म्हणून ते कार्यरत आहेत.
क्रीडा केवळ स्पर्धा नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. विद्यार्थी दशेपासूनच फुटबॉल, क्रिकेट आणि बास्केटबॉल या खेळांमध्ये त्यांनी जिल्हा व राज्य स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
विजय स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून योगा, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो यांसारख्या खेळांचे नियमित प्रशिक्षण आणि भव्य स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी अनेक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंतचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.
​महत्त्वाचे पुरस्कार: २९ ऑगस्ट २०२५ (राष्ट्रीय क्रीडा दिन) रोजी बीडचे जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, तसेच खासदार श्री. बजरंगबप्पा सोनवणे आणि आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा संघटक व प्रशिक्षक म्हणून गौरव.

​"केज तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य प्रशिक्षण, संधी आणि व्यासपीठ मिळाले पाहिजे. शालेय ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना घडवणे हे माझे ध्येय आहे," अशी भावना प्रा. गुंड पाटील व्यक्त करतात.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विजय स्पोर्ट्स अकादमी परिवारासह क्रीडा विश्वातील असंख्य खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
close