shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*पालक, शिक्षक यांना मोबाईल वापरायचे धोके - तोटे काय ? याची माहिती देणे गरजेचे - सीईओ आनंद भंडारी


जि.प.आणि ऋणानुबंध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल डिटॉक्स इंडिया लहान मुलांच्या मोबाईल अतिवापरा विरुद्ध मोहिमेचे उदघाटन संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
समाजामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहे एका कुटुंबातील चार व्यक्ती आपल्या घरामधील एका रूममध्ये बसले असले तरी प्रत्येक जण मोबाईलचा वापर करताना दिसतो, मोबाईल च्या अतिवापरामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी पोहोचत आहे. भारतीय माणूस सरासरी ६ तास मोबाईल,लॅपटॉपवर असतात त्यानंतर आपला प्रत्येक वेळ सोशल मीडियावर जातो, त्याचे फायदे - तोटे पाहणे गरजेचे आहे, विद्यार्थी देखील शालेय शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे त्यामुळे आत्मविश्वास खूप कमी होत चालला आहे, तसेच अभ्यासाची प्रगती खालवली जाते आणि नको त्या गोष्टीच्या आहारी विद्यार्थी जातात, ऑनलाइन ए आयच्या वापरमुळे त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो, खूप अनावश्यक गोष्टी मोबाईलवर पाहिले जातात त्याचा परिणाम मुलांवर गंभीर होतात, आपल्या लक्षात राहण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे, पूर्वी आपण वृत्तपत्राचे वाचन करायचो, टीव्हीवर बातमी पाहायचो ,पुस्तके वाचायचो, त्यातील विषय चांगले असायचे त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढली जायची, आता आपण मोबाईल पाहत असताना त्यावेळेस वेगवेगळे विषय येतात आणि त्यातून अनावश्यक माहिती येते आपल्याला कळत देखील नाही आपण काय पाहतो, त्यामुळे आपली मेमरी कमी होते, दिवसेंदिवस विसरण्याचे प्रमाण वाढत आहे, विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर व ऋणानुबंध सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला असून पहिल्यांदा पालक - शिक्षक यांना मोबाईल वापरायचे धोके, तोटे काय आहे याची माहिती देणे गरजेचे आहे,त्याचा वापर कसा कमी करता येईल हे सांगणे गरजेचे आहे, पालकांच्या हातातील मोबाईल वापरायचे प्रमाण कमी झाल्यास विद्यार्थ्यांना देखील आपल्याला समजून सांगता येईल की मोबाईल वापरू नये त्याचे दुष्परिणाम वाईट आहे याची सुरुवात पालक आणि शिक्षकांपासून करायची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल डिटॉक्स इंडिया लहान मुलांच्या मोबाईल अतिवापरा विरुद्धची कार्यशाळा या कार्यक्रमाप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या समवेत ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, मनपा प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे, अभिनव आयटीचे प्रा. मुरलीधर भुतडा, ऋणानुबंध संस्थेचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी,सचिव प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. खंडागळे, डॉक्टर कंगे, प्रतिभा साबळे, डॉक्टर झेंडे, सचिन परदेशी, भानुदास महानोर,मोहन परोपकारी, सोमवंशी दांपत्य, यांच्यासह ऋणानुबंधाची अनेक सदस्य तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

    यावेळी ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे म्हणाले की, आपला देश हा युवकांचा म्हणून ओळखला जात असताना मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे मुले मैदानी खेळापासून दूर गेल्यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, मुलांना मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि ऋणानुबंध संस्थेने पुढाकार घेत देशातील पहिला प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरू केला आहे, या माध्यमातून पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये मोबाईलच्या अतिवापराचा दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जाईल,मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन की ज्यामुळे मुले वापरत असलेल्या नको असलेल्या वेबसाईट, गेम्स, ब्लॉक करणे किंवा त्यांचा मोबाईल वापरण्याचा वेळ निर्धारित करणे  पालकांना  शक्य होणार आहे. हे मोबाईल एप्लीकेशन या मोहिमेच्या अंतर्गत अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन उपलब्ध करून दिला जाणार आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य असून त्यांना मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल यासाठी ऋणानुबंध संस्था काम करणार असल्याचे ते म्हणाले.
       विद्यार्थी दशेतच मुलांच्या मोबाईल अतिवापराचे भीषण वास्तव व त्यामुळे मुलांना कमी वयात शैक्षणिक, शारीरिक, मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडावे लागणे हे चिंताजनक स्तरावर पोहोचले आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास येत्या पिढ्यांमध्ये त्याचे भयंकर दुष्परिणाम होतील अशी भीती अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. मोबाईलचा अतिवापर लहान मुलांमध्ये धोकादायक पातळीवर पोहोचत असून, रिल्स, युट्युब व्हिडिओ अश्लिलता, गेमिंग याचा वाढता वापर धक्कादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरला डिसीज म्हणून २०१९ सालीच मान्यता दिल्याने हा धोका अधोरेखित झाला आहे.
       अहिल्यानगर मधील ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ ही मोहीम छेडली आहे , मागील काही वर्षात मोबाईलच्या वापराचे व्यसनात रूपांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील सर्वे मधील सर्वे केलेल्या मुलांपैकी आकडेवारी धक्कादायक आहे पौगंडावस्थेतील ३३% मुले मोबाईल व्यसनाधीन झाले आहेत. (मुले ३३.६% मुली ३२.३%). ५ ते १६ वर्ष दरम्यानच्या ६० % मुलांमध्ये तत्सम लक्षणे जाणवत आहे. ८५% पालकांना मुलांच्या या सवयी बदलणे अवघड जात आहे. एका सर्वेमध्ये असे दिसून आले आहे की ५४% माता स्वतःचे काम शांतपणे संपवण्यासाठी मुलांना मोबाईल देतात. 
           मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर मोठ्या प्रमाणावर शारीरिक परिणाम होतो. एका सर्वेनुसार सर्वे केलेल्या मुलांपैकी ३४.५.% मुलांवर मनगट आणि मानेचे विकार जडले आहेत. ५४.८% मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेले दिसले आहेत. चिडचिडेपणा, हिंस्रता, एकटेपणा, निद्रानाश, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे लहान वयातच जाणू लागले आहेत. भारतीयांचे सरासरी रोजचा स्क्रीन टाईम ६ तास ३७ मिनिटे झाला आहे आणि हा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच आहे.
      ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने जिल्हा परिषद आहिल्या नगरच्या सहकार्याने यासाठी मोहीम उघडली असून या मोहिमे अंतर्गत संपूर्ण नगर जिल्ह्यातील ८,३८,000 विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या संतुलित मोबाईल वापराबाबत वेबिनारच्या माध्यमातून जागरूक केले जाणार आहे  यासाठी यासाठी डॉ. ज्ञानेश्वर कांबळे की जे भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग चे राष्ट्रीय प्रशिक्षक व कौशल्य विकास मंत्रालयाच्या मिशन कर्मयोगी साठीचे तज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे.
         जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र वेबिनार आयोजित करण्यात येणार असून या वेबिनार मध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक परिणाम याबाबत नामवंत डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, शिक्षण तज्ञ, समाजसेवक यांचे मार्गदर्शन तसेच यावरील विविध उपाय योजना की ज्यामध्ये योगा, मेडिटेशन, विविध ॲपचा वापर करून मुलांच्या मोबाईल वापरावर कसे बंधन घालता येईल याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
 या वेबिनार मध्ये संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, डॉक्टर सुधा कांकरिया, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. पै रायतुरकर, जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने, डॉ. तेजस्विनी मिस्किन, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. उमेशचंद्र सुद्रीक या तज्ञांची मते पालकांना ऐकता येणार असल्याची माहिती ऋणानुबंध सामाजिक संस्थेने दिली.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -9561174111
close