प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १३/ कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे विद्यालयांमध्ये सातारा येथील ज्ञानश्री इंजीनियरिंग कॉलेजमधील अमृता चिकलगे, बी एस नाळे, एस एम पाटील, विजय माने, विजय चव्हाण, सुचिता पवार, निकिता खामकर, यांनी सदिच्छा भेट दिली.
त्यांनी विद्यालयाची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी केले जाणारे उपक्रम तसेच विद्यालयातील वेगवेगळ्या सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले. बी एस नाळे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे स्वरूप आयोजन विविध बक्षिस या बाबत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना माहिती दिली व माढा तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे यांनी या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले. भविष्यामध्ये येणाऱ्या विविध आव्हानांना या विज्ञान प्रदर्शन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होऊन भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना विद्यार्थी सामोरे जातील असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

