अहिल्यानगर : देहरे येथील ज्येष्ठ नागरिक जनाबाई पांडुरंग धनवटे (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने धनवटे कुटुंबासह गावातही शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मागे वाल्मिक व रोहीदास ही दोन मुले, तर सागर, अक्षय आणि शुभम ही नातवंडे असा परिवार आहे.
माजी सरपंच मेघनाथ विजय धनवटे यांच्या त्या आजी होत.
शांत, सौम्य स्वभाव आणि कुटुंबवत्सळ अशी जनाबाई धनवटे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

