उमरी/ नांदेड: कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. गजानन अनंता देवकर यांना बेंगलोर कर्नाटक येथील नामांकित भोवी लेजेंड्स या सामाजिक संस्थेचा लेजेंड्स ऑफ कम्युनिटीचा भोवी लेजेंड्स २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. भोवी लेजेंड्स गांधी भवन कुमार कृपा रोड बेंगलोर येथील संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो असे नॅशनल ओड कम्युनिटी ऑफ इंडिया जनरल सेक्रेटरी श्री. शिवरुद्राय्या स्वामी यांनी कळविले आहे.डाॅ.गजानन देवकर हे आध्यापनासमवेतच साहित्य, सामाजिक,आध्यात्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने कार्य करतात म्हणून भोवी लेजेंड्स ( भोवी महापुरुष) पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हा पुरस्कार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी अखिल भारतीय समारंभ सोहळ्यात बेंगलोर सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे असे संयोजन समितीच्यावतीने कळविले आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नुतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.गोविंदराव मुक्कावार शिरूरकर,नुतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव श्री.कैलासराव देशमुख गोरठेकर,लाल बहादूर शिक्षण संस्थेचे सचिव श्री.शिरीषराव देशमुख गोरठेकर,प्राचार्य डॉ.पी.आर गाटे,उपप्राचार्य डाॅ. व्ही.बी.गणिपूरकर,नानकसाई फाऊंडेशनचे चेअरमन श्री.पंढरीनाथ बोकारे,जिल्हा परिषद नांदेड माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. संभाजी धुळगुंडे,सामाजिक कार्यकर्ते श्री.किशनराव रॅपनवाड,माजी नगरसेवक श्री. अनंत रॅपनवाड व गोरठेकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तरी व मित्र मंडळीनी अभिनंदन केले.

