📌 विधवा महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तसेच बांधकाम कामगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अनोख्या पद्धतीने उद्घाटन सोहळा संपन्न..
राहुरी फॅक्टरी.. दि. 4 डिसेंबर राहुरी फॅक्टरी येथे ताहाराबाद रस्त्यावर डिपॉल चौकात आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ झाला असून.. प्रसंगी राजकारण विरहित प्रास्ताविक करताना ढूस यांनी सांगितले की, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा असून राहुरी फॅक्टरी येथील एकल (विधवा) भगिनी, दिव्यांग तसेच वयोवृद्ध नागरिक आणि बांधकाम कामगार यांची होणारी पायपीट थांबणार आहे.. आणि नागरिकांचे प्रश्न तात्काळ सुटण्यास या कार्यालयामुळे मदत होणार असल्याचा विश्वास प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला.
परिसरातील विधवा महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक तसेच असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अनोख्या पद्धतीने हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला..
प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक ललित शेठ चोरडिया, माजी उपअध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, राहुरी अर्बन चे रामभाऊ काळे, तैनूर भाई पठाण, मनीष शहाणे, कामगार नेते चंद्रकांत कराळे, शरद वाळके, रजनीताई कांबळे, गणेश भालके, बंटी भाऊ लोंढे, प्रकाश वाकळे, प्रभाकर कांबळे, प्रतीक फुलपगार, सनीभाऊ जगताप, सनी सोनवणे, विकी पंडित, लैला शेख, वंदना कांबळे, इम्रान शेख आदींसह परिसरातील मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता..
पुढे बोलताना ढूस म्हणाले की, निस्वार्थ भावनेने आम्ही जनतेची सतत सेवा करत आलो आहोत, यापुढेही आमची सेवा अविरत सुरू राहणार असल्याने तसेच थेट राहुरी फॅक्टरी येथून आम्हाला भेटायला वृद्ध नागरिक व महिला वर्ग देवळाली प्रवरा येथे येत असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मग ते वृद्ध नागरिक असतील, विधवा भगिनी तसेच दिव्यांग नागरिक आणि असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार असतील अशा सर्वांचे सर्व प्रश्न एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी आम्ही हे जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहोत.. विशेषतः महिलांच्या हाताला काम देण्याला आमचे प्राधान्य असणार असून कार्यक्रमाला जनतेचा लाभलेला उस्फुर्त प्रतिसाद हिच आपल्या कामाची पावती आहे. त्यामुळे मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.. असे समजून आम्ही सदैव जनतेसाठी उपलब्ध होतो.. आहोत.. आणि यापुढेही राहणार.. हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचे आहे.. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीशासन दरबारी असलेल्या आपल्या समस्यांसाठी आप्पासाहेब भिमराज ढूस जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करावा असे आवाहन प्रसंगी ढूस यांनी केले.
यावेळी ललित शेठ चोरडिया, आप्पासाहेब कोहकडे, रामभाऊ काळे, चंद्रकांत कराळे, तैनूरभाई पठाण आदी मान्यवरांनी शुभेच्छा देताना आप्पासाहेब ढूस यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला.. तसेच ढूस यांचे संकल्पनेतील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लागणारी जागा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे ललित शेठ चोरडिया आणि आप्पासाहेब कोहकडे यांनी त्यांचे मनोगतामधून मान्य केले.
आभार चंद्रकांत कराळे यांनी मानले..

