वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) :-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अरणंगाव केंद्र व वाळकी केंद्र यांच्या केंद्रशाळेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा पार पडल्या,
स्पर्धेमध्ये प्रामुख्याने चित्रकला स्पर्धा,डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे,संगीत खुर्ची,फुग्यांची समन्वय स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन केलेले होते स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व स्पर्धकांना फुल देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले, त्यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचे मन अतिशय द्विगुणीत होऊन त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होतं,त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे मनोगत झाले, मनोगत होत असताना अक्षरशः पालकांचे मन भारावून गेले, त्यानंतर मुख्या.सौ. लहाकर मॅडम व श्री सुनिल लगड सर यांचे मनोगत झाले, त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांचे मनोगत झाले
नियोजन विशेष शिक्षिका श्रीमती.भारती दरेकर मॅडम व सौ.माया हराळ मॅडम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले स्पर्धा नगरपंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती.कोलते मॅडम, अरणगाव बीटच्या विस्तार अधिकारी साठे मॅडम,व वाळकी बीटच्या विस्तार अधिकारी माने मॅडम, केंद्रप्रमुख उदार साहेब,तसेच अरणगाव शाळेच्या मुख्या. लहाकर मॅडम वाळुंज शाळेचे सुनील लगड सर व सर्व शिक्षक वृंद व सर्व दिव्यांग विद्यार्थी पालक यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

