*उलुक महोत्सवातील सहभागाबद्दल व्याहाळी शाळेस सन्मान चिन्ह व मुलांना प्रमाणपत्राचे वाटप.
इंदापूर: इला फाउंडेशन आयोजित 6 वा भारतीय उलुक महोत्सव 2025 दि 5 व 6 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या महोत्सवामध्ये व्याहाळी शाळेतील मुलांनी सहभाग घेऊन अतिशय सुंदर चित्रे पोस्टर कोलाज बनवल्याबद्दल *इला फाउंडेशनचे समन्वयक पक्षीमित्र पक्षी निरीक्षक राहुल लोणकर यांनी व्याहाळी शाळेस सन्मानचिन्ह व मुलांना प्रमाणपत्राची वाटप केले..*
यावेळी लोणकर म्हणाले , घुबड हे भीतीदायक नसून त्याचे दिसणे आवाज व अधिवास यामुळे तो भीतीदायक वाटतो. रात्रीच्या वेळेस बाहेर पडून शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणारे उंदीर व इतर कीटक खाऊन तो गुजरात करतो व शेतकऱ्याचा मित्र म्हणून काम करत असतो. घुबडाच्या विविध बेचाळीस प्रकारच्या प्रजाती त्याचा अधिवास त्याचे खाणे त्याचा उपयोग अशी माहिती लोणकर यांनी सांगितली. त्याच्याविषयी बऱ्याच अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. या अंधश्रद्धा संपवून घुबड या पक्षालाही इतर प्रेक्षाप्रमाणे प्रेम द्यावे जपावे अशी विनंती केली. महोत्सवात विविध चित्रे आकार प्रतिकृती तयार करून सहभागी होण्याचे आवाहन केले.
*प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण निंबाळकर पदवीधर शिक्षक प्रभाकर लावंड संजय माळवे उपशिक्षक तात्याराम धायतोंडे खुशाली येडे व मुले उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले व कैलास गावडे आभार मानले.*

