shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्या प्रतिष्ठानची वाटचाल शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीने उजळली”— प्राचार्य डॉ. सुजय देशपांडेमहाविद्यालयात अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा

विद्या प्रतिष्ठानची वाटचाल शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीने उजळली”— प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे
महाविद्यालयात अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा
इंदापूर: विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे विद्या प्रतिष्ठानचे माननीय अध्यक्ष तथा राष्ट्रनेते
शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ.
सुजय देशपांडे यांनी शरद पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी उजाळल्या तसेच त्यांच्या दूरदृष्टी,
समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा आढावा घेतला.
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले की, “शरदचंद्रजी पवार साहेब हे समाजासाठी सतत कार्यरत
राहिलेले नेतृत्व आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांची बांधिलकी आणि विद्यार्थ्यांसाठीच्या संधीवृद्धीचे धोरण आज
विद्या प्रतिष्ठानमध्ये आम्हाला मार्गदर्शक ठरत आहे.”
प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आपल्या भाषणात माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या
व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या कार्यशैलीची आणि शिक्षणक्षेत्रातील दूरदृष्टीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले
“माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे केवळ राष्ट्रनेते नाहीत, तर समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकासाची उभी
झेप पोहोचवणारे एक अपवादात्मक नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्या प्रतिष्ठानने केवळ विस्तारच
साधला नाही, तर गुणवत्तेची नवी परंपरा निर्माण केली आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली करून
विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दुरदृष्टीपूर्ण
निर्णय पवार साहेबांनी घेतला, हे अत्यंत उल्लेखनीय आहे.”ते पुढे म्हणाले “शिक्षणामध्ये प्रगती करणे म्हणजे
फक्त इमारती उभारणे नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी वातावरण निर्मिती करणे—याच
तत्त्वज्ञानावर शरद पवार साहेब कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महाविद्यालय नवीन
प्रयोगांना प्रोत्साहन देत आहे, आधुनिक प्रयोगशाळा, कौशल्यविकास कार्यक्रम, उद्योगसंवाद आणि स्टार्टअप
संस्कृतीचा प्रसार करत आहे.”
विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्याचे
महत्वपूर्ण कार्य पवार साहेबांनी शिक्षण संस्थांमार्फत साधले. त्यामुळेच आज आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांचा हा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा घेण्याचा आणि
त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे जाण्याचा दिवस आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ यांनी केले. प्रास्ताविक करताना त्यांनी माननीय
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याची प्रशंसा करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले “आज आपण
एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा करत आहोत, ज्यांनी शिक्षण, कृषी, सहकार, सामाजिक
परिवर्तन आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या पातळीवर अमिट ठसा उमटवला आहे. पवार साहेबांची बहुआयामी

कामगिरी ही केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य,
अध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. माननीय पवार
साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच आमची मनोकामना आहे.”
close