शिर्डी प्रतिनिधी:- साईसेवेचा वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा ध्यास घेत, सत्य, प्रामाणिकपणा आणि अथक कार्यक्षमता या गुणांची जोड मिळालेल्या भरत (माऊली) भोईर यांना शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवेने मुंबई विभाग विशेष प्रतिनिधी म्हणून प्रतिष्ठेची जबाबदारी सोपविली आहे.
शिर्डी एक्स्प्रेस हे वृत्तपत्र केवळ बातम्यांचे साधन नसून—
साईबाबांच्या विचारांची, शिकवणीची आणि सद्भावनेची अखंड वाहिनी बनून काम करत आहे. या पवित्र ध्येयाचा प्रसार जगभर व्हावा, प्रत्येकाच्या हृदयात साईंचे संदेश पोहोचावेत, यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भरत माऊलींना ही निवड म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेला योग्य सन्मान आहे.
त्यांची सेवेची ओढ, लोकांसाठी नेहमी सज्ज राहणारी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन शिर्डी एक्स्प्रेसने त्यांच्यावर हा मानाचा मुकुट शोभिवला आहे. आता भरत माऊली मुंबईसह सर्वत्र साईभक्ती आणि सकारात्मक पत्रकारितेचा दीप प्रज्वलित करतील, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे.
या मानद नियुक्तीची बातमी समजताच
मित्रपरिवार, पत्रकार सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि साईभक्तांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
भरत माऊलींच्या व्यक्तिमत्त्वातील सचोटी, संवादकौशल्य आणि समाजहिताची बांधिलकी यामुळे ही निवड सर्वार्थाने योग्य ठरली आहे, असे बोलले जात आहे.
शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा त्यांच्या माध्यमातून
साई संदेशाचा उज्ज्वल प्रकाश अधिक वेगाने जगभर पोहोचेल,
असा ठाम विश्वास व्यक्त करीत आहे.
०००

