दोन दिवसांत काम सुरू न झाल्याने ठिय्या आंदोलन - बाळासाहेब हराळ
वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे) :- अहिल्यानगर तालुक्यातील अरणगाव-वाळकी-देऊळगाव सिध्दी, गुंडेगाव रस्ता व रुईछत्तीसी-मठपिंप्री-हातवळण या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे याबाब तचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या सह शेतकऱ्यानी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता उत्तम बोरुडे याना दिले.
जून २०२५ मध्ये अहिल्यानगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. सदर अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी होऊन रस्ते नादुरुस्त झाले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील १. आरणगाव,वाळकी,देऊळगावसिध्द,गुंडेगाव,रुईछत्तीसी,मठपिंप्री,हातवळण हे दोन रस्ते अत्यंत नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. अपघातामध्ये अनेक प्रववाशांना प्राण गमवावे लागले तर अनेक प्रवाशांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. अतिवृष्टी होऊन पाच ते सहा महिने झाले आहेत परंतु आपल्या दिरंगाईमुळे सदरचे रस्ते अदयापही दुरुस्त झाले नाहीत. या सर्व बाबींना आपण जबाबदार आहात. तूरी वरील रस्त्यांचे काम दोन दिवसात सुरु केले नाही तर आपल्या दालनात ठिय्या या आंदोलन करण्यात येईल. याबाबत अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व स्वी राहिल
अरुण मस्के जना माने महेंद्र शेळके, शरद पवार शरद परभणे, संदिप सुपेकर गणेश तोडमल यावेळी उपस्थित
सदर रस्त्याची अतिशय बिकट अवस्था अवस्था झाली आहे सोनाजी बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्यावर आतापर्यंत कित्येक जणांची अपघातात नुकसान झाले आहे याला सर्वस्वी हेच जबाबदार आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ

