मुख्य निमंत्रकपदी दशरथ पोपळघट,सोमनाथ हारेर,नवनाथ हराळे.
वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे):- अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय लोहार समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. हर्षल आगळे यांची, तर मेळाव्याचे मुख्य निमंत्रक म्हणून समाजातील ज्येष्ठ नेते दशरथ पाेपळघट, खाेसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर, तर पत्रकार नवनाथ हराळे यांची निवड करण्यात आली. याची घोषणा अखिल लोहार समाज विकास संघ घोषणा संदीप थोरात यांनी बुधवारी केली.शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात ११ जानेवारी २०२६ रोजी हा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. मेळावा नियोजनाची बैठक शहरात बुधवारी झाली. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे हे होते. व्यासपीठावर प्रभाकर लाड, संदीप थोरात, विश्वनाथ लोखंडे, आप्पा लोहार, डॉ. मुकुंद लोखंडे उपस्थित होते.
बैठकीत मेळावा यशस्वी करण्यासाठी काय करता येईल, तसेच विविध समित्या, त्यातील सदस्य त्यांची काय जबाबदारी राहील यावर चर्चा झाली. या मेळाव्यात लोहार समाजातील कारागीर, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असे व्याख्यान ठेवले जाईल, तसेच समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. या वधूवर परिचय मेळाव्याची स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बैठकीला बाळासाहेब इघे, अमोल जवणे, सुधाकर कौसे, रोहिणी हराळे, पत्रकार अनिल हिवाळे, दादासाहेब आगळे, गणेश भालके एकनाथ कौसे, अशोक पवार, अशोक हराळे, डॉ. मच्छिंद्र गाडेकर,भास्कर थोरात, निवृत्ती पोपळघट, विजय म्हस्के, सागर आगळे, हितेश कावरे, मनोज लोखंडे, विजय जगताप, पितांबर जवणे, श्रीहरी आगळे,ऋषिकेश कौसे आदींसह समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ हराळे यांनी केले. त्यांनी या मेळाव्याची रुपरेषा सांगितली, तर संदीप थोरात यांनी हा मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. यासाठी स्थाानिक समाज बांधवांनी परिश्रम घेऊन यशस्वी करावा. लोहार समाजात आजपर्यंत झाला नाही, असा मेळावा करायचा असल्याचे सांगितले. आभार अखिल लोहार समाज विकास संघाचे सहसचिव बाळासाहेब इघे यांनी मानले.
मेळावा यशस्वी करणार
शहरात होणाऱ्या लोहार समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माझ्यावर विश्वास ठेवून समाजाने स्वागताध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल सर्वांचे आभार. शहरात प्रथमच समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा होत आहे. आज मुला - मुलींची लग्नं जमवणे हे कठीण बाब असल्याची जाणीव वधू - वरांच्या पालकांना येत असल्याची उदाहरणे आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून तो उपवर वधुंना आमंत्रित करुन त्यांना योग्य जीवनसाथी देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच हा मेळावा यशस्वी करू
-हर्षल आगळे, नूतन स्वागताध्यक्ष.

