नागरिकांना लाल इशारा : अशा "गुंतवणुकीच्या" सापळ्यापासून दूर रहा!
मुंबई :
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणांना सध्या नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. फिल्म इंडस्ट्रीच्या नावाखाली काम देतो, रोल देतो, पैसे परत दुप्पट करतो या गाजावाजा करत नकली निर्माता-दिग्दर्शकांची टोळी बाजारात सक्रिय झाली असून आतापर्यंत २०–२५ नवोदित कलाकार लाखो रुपयांनी फसले आहेत, अशी भीषण माहिती पुढे आली आहे.
ही व्यक्ती स्वतःला कधी निर्माता, कधी दिग्दर्शक, तर कधी अभिनेता म्हणून मिरवते.
एक-दोन अर्धवट, दर्जाहीन प्रोजेक्ट दाखवून लोकांचा विश्वास मिळवतो आणि नंतर सुरू करतो ‘स्वप्न विकण्याचा धंदा’.
🎭 कसा रचतो फसवणुकीचा डाव?
व्हॉट्सअपवरून ‘नवीन बिग प्रोजेक्ट येतोय’ अशी अर्धवट माहिती पाठवून, तो कलाकारांना आमिष देतो—
“तुम्हाला मेन रोल, साईड रोल, छोटा रोल… सर्व पक्का!
फक्त १,००० ते १ लाख रुपये मदत करा.
चार महिन्यात दुप्पट–पाचपट परतावा हमखास!”
अनेकांनी विश्वास ठेवून पैसे दिले. पण नंतर दिसते सत्य—
❌ करारपत्र देत नाही
❌ भेट होणार म्हणतो पण गायब
❌ चित्रपटात रोल नाही
❌ दिलेले पैसे परत नाही
❌ आणि नवे बळी शोधण्याचा पक्काच धंदा!
फिल्ममध्ये काम मिळवण्याचे स्वप्न दाखवून, दिशाभूल, आर्थिक उकळी आणि नंतर अज्ञात ठिकाणी लपणे हेच या व्यक्तीचे काम असल्याची पुष्टी अनेक पीडितांनी दिली आहे.
🎬 जाणकारांचे मत : “हा निर्माता नव्हे, केवळ भ्रमफिरवी!”
चित्रपटसृष्टीतील अनुभवी व्यक्तींचे म्हणणे आहे की—
> “या व्यक्तीकडे कोणतीही दिग्दर्शनाची क्षमता नाही. प्रोजेक्ट दर्जाहीन व अपूर्ण असतात.
‘सिनेमा येतोय’ हे फक्त मुखवटे. खरा उद्देश— पैसे उकळणे!”
🚨 सावधान! – नागरिकांना रेड अलर्ट!
अशा प्रकारच्या बनावट ‘निर्माते-दिग्दर्शकां’पासून दूर राहा. पैसे देण्यापूर्वी—
✔ अधिकृत नोंदणी, PAN–GST, प्रोडक्शन हाऊस तपासा
✔ लिखित करारपत्राशिवाय एक रुपयाही देऊ नका
✔ फक्त व्हॉट्सअपवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका
✔ काम देण्याच्या नावाखाली पैसे मागणे— गुन्हा आहे
✔ संशयास्पद वाटताच तक्रार नोंदवा
⚠️ आमिषाला बळी पडू नका!
फिल्म इंडस्ट्रीत प्रवेशाची संधी मिळावी या इच्छेचा फायदा घेत अनेक तरुणांची स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत.
या संदिग्ध व्यक्तीविरुद्ध रोज नवीन पुरावे समोर येत आहेत.
पुराव्यांची अधिकृत खातरजमा झाल्यानंतर —
संबंधित “निर्माता” आणि त्याच्या टोळीची पूर्ण माहिती, नावासह, शिर्डी एक्स्प्रेस लाईव्हवर उघड करण्यात येणार आहे.
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्हची जनतेला विनंती
“प्रसिद्धीच्या मोहापायी दिशाभूल करणाऱ्या आमिषाला बळी पडू नका.
सत्याची खातरजमा करा.स्वप्नांसोबत पैसाही सुरक्षित ठेवा.”
००००

