shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोलच्या मल्लांची राज्य–राष्ट्रीय पातळीवर भरारी.

एरंडोलच्या मल्लांची राज्य–राष्ट्रीय पातळीवर भरारी

एरंडोलच्या मल्लांची राज्य–राष्ट्रीय पातळीवर भरारी

एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे सुजल अनिल भोई यांची १७ वर्षे, ५५ किलो वजन गटात ग्रीको–रोमन प्रकारात चाळीसगाव येथे झालेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली. तसेच प्रेरणा अनिल मराठे (६२ किलो) यांची कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने धुळे येथे झालेल्या इंटर युनिव्हर्सिटी ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून ऋषिकेश महाजन यांनी काम पाहिले. 

या खेळाडूंना संघाध्यक्ष भानुदास आरखे, वस्ताद अनिल मराठे, दिलीप सोनवणे व राष्ट्रीय खेळाडू योगेश्वरी मराठी यांचे मार्गदर्शन लाभले. आमदार अमोल पाटील, ॲड. किशोर काळकर, प्रा. मनोज पाटील, आनंद दाभाडे, पंकज पाटील, संजय काबरा यांच्यासह शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

close