shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नथ्थूबापू यात्रेत दागिने चोरीचा सुळसुळाट; महिलांमध्ये भीती.

नथ्थूबापू यात्रेत दागिने चोरीचा सुळसुळाट; महिलांमध्ये भीती.

प्रतिनिधी – एरंडोल नथ्थू बापूंच्या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत असताना महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून मंगळसूत्रे, चेन कापण्याचे प्रकार घडत असून अनेक महिलांना घटनेची जाणीव उशिरा होत असल्याने चोरटे पसार होत आहेत.या मुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस बंदोबस्त असला तरी महिला पोलीस पथक, सीसीटीव्ही संख्या वाढविणे, टेहळणी कडक करणे व ध्वनिवाहिनीद्वारे सतत सूचना देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भाविकांनी मौल्यवान दागिने टाळावेत व संशयित दिसताच पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

close