shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य विमा नाकारल्यावर अखेर न्याय; डॉ. गीतांजली ठाकूर यांच्या लढ्याला यश.

आरोग्य विमा नाकारल्यावर अखेर न्याय; डॉ. गीतांजली ठाकूर यांच्या लढ्याला यश.

एरंडोल (प्रतिनिधी):केअर हेल्थ विमा कंपनीकडून वारंवार आरोग्य विमा दावे नाकारल्यानंतर एरंडोलच्या माजी नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर यांच्या दीड वर्षांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले. पुणे येथील माननीय विमा लोकपालांच्या आदेशाने कंपनीला सर्व दावे मंजूर करावे लागले असून ४ डिसेंबर २०२५ रोजी शेवटची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली.

नोव्हेंबर २०२१ मध्ये दुर्धर आजाराचे निदान झाल्यानंतर कॅशलेस सुविधा नाकारल्याने ठाकूर कुटुंबीयांनी स्वतःच्या खर्चाने उपचार केले होते. त्यानंतर सादर केलेले नऊ विमा दावे ‘माहिती लपविल्याचा’ आरोप करत कंपनीने फेटाळले. याविरोधात जून २०२२ मध्ये विमा लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यात आली. प्राथमिक तीन दावे मंजूर झाल्यानंतर उर्वरित सहा दावेही लोकपालांच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आले.

डॉ. गीतांजली ठाकूर यांचा हा लढा आरोग्य विमा दावा नाकारल्यास नागरिकांनी योग्य ठिकाणी दाद मागावी, याचा मार्ग दाखवणारा असून विमा कंपन्यांच्या मनमानीविरोधात महत्त्वाचा संदेश देणारा ठरला आहे.

close