shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - पालकांनी मुलांच्या शैक्षणिक अध्ययना बरोबर मोबाईलचा वापर कमी करावा - अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे

 वडाळा महादेव [ प्रतिनिधी ] :- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.येथील शाळेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा याच उद्देशाने  शाळेमध्ये नावीन्यपूर्ण सतत वर्षभर विविध उपक्रम साजरे  करण्यात येत असते  स्नेहसंमेलन या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन शिवस्मरण महानाट्य जिवंत देखावा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रमुख घटकांचे जिवंत चित्रण विद्यार्थ्यांच्या रूपाने वडाळा महादेव येथील शाळेच्या प्रांगणात पहावयास मिळाले.

 सदर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच संस्थेचे समिती सदस्य श्री अविनाश कुदळे श्री सागर भोंगळे इंजी श्री भाऊसाहेब वाघ संस्थापक अध्यक्ष संदीप कसार सर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे श्री सुधीर कसार सौ जनाबाई कसार सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब कसार श्री वमने सर सरपंच सचिन पवार 
 पत्रकार राजेंद्र देसाई  रवीद्र आसने मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री आघाडे आदी प्रमुख मान्यवर प्रसंगी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन तसेच  श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री सरस्वती देवी तसेच गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 प्रसंगी उपस्थित विद्यार्थी पालक वर्ग यांना मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब यांनी पालकांनी घ्यावयाची विशेष काळजी तसेच शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अध्ययनाबरोबर विवीध कलागुणांचा तसेच आध्यात्मिक सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये विकास होत असून भविष्यात सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार असल्याचे प्रतिपादन केले तसेच येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष  प्रिन्सिपल शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती अतिशय छान पद्धतीने अध्ययन घेत असून भौतिक अध्यात्मिक ज्ञानाचा यामध्ये समाविष्ट असल्याने सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होणार असल्याबद्दल श्री वाकचौरे साहेब यांनी  आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र शिवस्मरण महानाट्याच्या माध्यमातून सादर केले याबद्दल  सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थित पालक वर्ग यामधून कौतुक करण्यात आले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री आघाडे   राहुल विसपुते सुचित्रा पुजारी  तसेच इतर शिक्षक वृंद प्रयत्नशील होते या महानाट्याचा शिवराज्याभिषेक होऊन समारोप करण्यात आला उपस्थित सर्वांचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप कसार सर मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री आघाडे यांनी आभार मानले.
close