shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांचा श्री साई संस्थान सोसायटीतर्फे सत्कार

आमच्या संस्थेच्या सभासदाच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याचा सार्थ अभिमान - विठ्ठल पवार

शिर्डी प्रतिनिधी: 
शिर्डी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि लोकनियुक्त नेत्या सौ. जयश्रीताई विष्णुपंत थोरात यांचा श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने नुकताच शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते आणि संचालक मंडळाने यावेळी सौ. जयश्रीताई आणि त्यांचे पती, संस्थेचे सभासद विष्णुपंत थोरात यांचा सन्मान केला.
 
साईबाबांना व मतदारांना विजय अर्पण
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, "हा विजय राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी टाकलेल्या विश्वासाचा विजय आहे. मी हा विजय शिर्डीतील जनता आणि साईबाबांच्या चरणी अर्पण करते." त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वीही नगराध्यक्ष असताना आणि विश्वस्त म्हणून काम करताना आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलो होतो, आणि भविष्यातही साई संस्थानचे कर्मचारी व शिर्डीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.
विजयाचा अदृश्य आवाज जाणवला: विष्णुपंत थोरात
याप्रसंगी बोलताना विष्णुपंत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "मी संस्थेचा कर्मचारी असल्याने प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होऊ शकलो नाही. परंतु, कर्मचाऱ्यांमध्ये असलेली चर्चा आणि अदृश्य सकारात्मक लाट मला जाणवत होती. आपल्याच कुटुंबातील एक सदस्य मोठ्या पदावर जात आहे, ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये होती, ज्याचा मला अभिमान वाटतो.
कामगारांचा आवाज आता संस्थानात: विठ्ठल पवार
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "आमच्या संस्थेच्या सभासदाच्या सौभाग्यवती आज नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सौ. जयश्रीताई आता पदसिद्ध विश्वस्त असल्याने कामगारांचे प्रश्न, मग ते कायमस्वरूपी असो किंवा कंत्राटी, सोडवण्यासाठी त्या नक्कीच न्याय देतील. त्यांचा विजय म्हणजे कामगारांचा आवाज आता संस्थानात आणि नगरपालिकेत पोहोचल्यासारखे आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जबाबदारी आणि शिर्डीच्या विकासाची धुरा सौ. जयश्रीताई समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास यावेळी श्री साई संस्थान सोसायटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
यावेळी चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
close