श्रीरामपुर [ प्रतिनीधी ]
रेशीमगाठी वधू वर व समुपदेशन मेळावा रविवार, दिनांक १८ / ०१ / २०२६ रोजी पुणे या ठिकाणी उत्साहात संपन्न प्रसंगी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे लॉन्ड्री संघटनेचे कार्याध्यक्ष सन्मा.अनिलजी हुपरीकर संचलित टीम रेशीमगाठी वधू-वर सूचक मंडळ यांच्या वतीने आयोजित उच्चस्तरीय रेशीमगाठी परीट समाज वधू-वर व समुपदेशन मेळावा २०२६ हा कार्यक्रम माऊली मंगल कार्यालय, कात्रज–कोंढवा रोड, पुणे येथे अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भाजप नेते आदरणीय राजाभाऊ किसनराव कदम यांनी भूषविले. तसेच राज्य परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय खंडेरावजी कडलग, श्री.उत्तम तेलंग, श्री.सनतवढाई , श्री. संतोष भालेकर, श्री. नानासाहेब वाघमारे, श्री माधवराव देसाई, श्री दिगंबर हौसारे सो. श्री. गोविद राऊत, श्री. सुनील फंड हे समाजातील मान्यवर प्रमुख उपस्थिती लाभली. समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, वधू-वर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सन्माननीय राजेंद्रजी फंड यांनी अत्यंत प्रभावी, वेळेचे काटेकोर नियोजन ठेवून केले.
या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे AI व डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. आगाऊ डिजिटल नोंदणी, PDF/Excel बायोडेटा फाईल, टोकन क्रमांक प्रणाली यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी वेळेची मोठी बचत झाली आणि सर्व व्यवस्थापन अधिक सुकर झाले. स्टेजवरील डिजिटल स्क्रीन प्रेझेंटेशनमुळे वधू-वरांची माहिती स्पष्टपणे सर्वांना समजली.प्रत्येक वधू-वराच्या ओळखीवेळी पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू व संक्रांतीचे वाण हा उपक्रम सन्माननीय सौ. सुषमाताई अमृतकर यांच्या माध्यमातून सुंदररीत्या पार पडला. उत्तम स्टेज व्यवस्था, ध्वनी प्रणाली, व्हिडिओ/फोटो, सत्कार साहित्य, आसन व्यवस्था तसेच चहा-पाणी व जेवणाची उत्कृष्ट सोय यामुळे उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
समाजहिताचा संदेश देताना मान्यवरांनी विवाह जुळविताना अनावश्यक अपेक्षा व आर्थिक देवाण-घेवाण टाळून विचार, ध्येय, संस्कार व विश्वास यावर नाते जुळवावे असे मार्गदर्शन केले. जवळपास २५० पेक्षा जास्त वधू-वर आणि ५००पेक्षा जास्त पालक उपस्थित राहणे ही या उपक्रमाच्या यशाची साक्ष ठरली.एकूणच हा मेळावा केवळ परिचयापुरता मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संस्कार, समुपदेशन, पालकांचा सन्मान व महिलांचा आदर यांचे सुंदर मिश्रण ठरला आणि महाराष्ट्रातील एक आदर्श व प्रेरणादायी उपक्रम म्हणून निश्चितच उल्लेखनीय ठरला.
मेळाव्याचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन महाराष्ट्रभरातून आलेले रेशीमगाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री.अनिल रामचंद्र खडके (हुपरीकर), पुणे,श्री.दत्तात्रय क्षीरसागर,सोलापूर,सौ.सुष्माताई अमृतकर अमरावती ,श्री. प्रशांत शिंदे कोल्हापूर,
श्री.योगेश रोकडे नाशिक,श्री.महेश यादव, कोल्हापूर,श्री.किरण बांदेकर बेळगाव,श्री.राजेंद्र फंड,आहिल्या नगर ,श्री. डि . एस . राऊत नाशिक,श्री. अमित जाधव पुणे,श्री.प्रकाश अभ्यंकर पुणे, श्रीमती, सुनिता राक्षे,सांगली,
श्री.दिलीप काटकर सातारा, श्री,विशाल राऊत,धाराशिव यांनी केले संयोजन समिती यांचेकडून मान्यवरांचा सन्मान तसेच उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

