shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; फरक बिल थेट बँक खात्यात देण्याची मागणी – त्रिंबक पा. भदगले

नेवासा :
कांदा उत्पादक शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करीत असून, कांदा पिकवण्यासाठी लागणारा वाढता खर्च आणि बाजारातील घसरते दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बी-बियाणे, खत, औषधे, पाणी, मजुरी तसेच साठवणूक यासाठी हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे.

बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली की दर कोसळतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. योग्य दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असून, अखेर अत्यल्प दरात विक्री करण्याची वेळ येत आहे. सध्या मिळणारे दर हे उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांच्या वतीने शासनाकडे ठाम मागणी करण्यात येत आहे की, कांद्याला शासनाने ठरवून दिलेला रास्त दर आणि प्रत्यक्ष बाजारभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. कोणताही मध्यस्थ, व्यापारी अथवा प्रक्रियात्मक अडथळे न आणता थेट आर्थिक मदत दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
तसेच कांद्याची निर्यात फक्त बांगलादेशापुरती मर्यादित न ठेवता, इतर देशांशीही स्थिर आणि दीर्घकालीन निर्यात धोरण सरकारने अवलंबावे, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. वेळेवर निर्यात परवानगी, प्रभावी बाजार हस्तक्षेप आणि फरक बिलाची थेट अंमलबजावणी न झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक पा. भदगले यांनी दिला आहे.
close