कार्यगौरव पुरस्कारातून ब्राह्मण युवा संघाचे उल्लेखनीय कार्य अधोरेखित
वडाळा महादेव [ प्रतिनिधी ]
ब्राम्हण युवा संघ व ब्राम्हण महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ब्राम्हण सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मकर संक्रांती स्नेहमेळावा श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून वेदशास्त्र संपन्न श्री. अनंत शास्त्री लावर गुरुजी यांची उपस्थिती लाभली. पारंपरिक औक्षण व सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या समाजप्रबोधनात्मक मार्गदर्शनात वेदमूर्ती अनंत शास्त्री लावर गुरुजी यांनी “कसे रहावे, कसे वागावे” यासह आजच्या ब्राम्हण समाजाची भूमिका, संस्कारांचे महत्त्व तसेच सण-समारंभांचे सामाजिक व सांस्कृतिक मूल्य यावर सखोल विवेचन केले. आचार-विचार, संस्कार आणि समाजबांधिलकी जपत संघटितपणे पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष वेदमूर्ती सचिन गुरुजी जोशी यांनी आपल्या भाषणात ब्राम्हण युवा संघाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आजची तरुण पिढी संघटित झाली तर समाजहितासाठी मोठे कार्य घडू शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ब्राम्हण संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. महेश क्षीरसागर यांनी पूर्वीच्या काळातील दिनचर्या, आयुर्वेदाचे महत्त्व सांगत समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा आढावा घेतला. तसेच प्रसिद्ध कर सल्लागार के. टी. जोशी यांनी समाज एकत्रीकरणाचे फायदे स्पष्ट करत, नियोजनबद्ध आणि दर्जेदार आयोजनाबद्दल ब्राम्हण युवा संघाचे कौतुक केले. या स्नेहमेळाव्यात समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते तिळगुळ वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये बालसंगोपन योजना घराघरात पोहोचविण्यासाठी श्री. मुकुंद टंकसाळे, योगा प्राणायाम योग भवनच्या माध्यमातूनआरोग्यसेवेसाठी श्री. अनिल कुलकर्णी, योगासन स्पर्धेतील प्राविण्याबद्दल चि. डॉ. अथर्व कोरडे, सूत्रसंचालन व सामाजिक कार्यासाठी श्री. प्रसन्नजी धुमाळ, सायकलिंग मॅरेथॉनमधील यशाबद्दल हार्दिक जोशी तसेच ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील प्राविण्याबद्दल ओंकार गुरु कुलकर्णी व सौ. पूजा जोशी यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ब्राम्हण युवा संघाचे श्री. सुबोध शेवतेकर यांनी अध्यक्षीय सूचना मांडली त्या नंतर प्रतिक वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अवधूत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.या कार्यक्रमास युवा संघाचे श्रेयश सुवर्णपाठकी, महेश जोशी (वडाळकर), तेजस काळे, मनीष कुलकर्णी, रुद्रप्रताप कुलकर्णी, हर्षल कुलकर्णी, प्रशांत गीत, अथर्व मुळे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच श्री विश्वनाथ औटी, डॉ. नवनीत जोशी, वासुदेवजी काळे, अभिजित मुळे, अनिलदादा कुलकर्णी, संजय पुराणिक, रत्नाकर कोरडे गुरुजी, जगदीश मेंगदे, श्रीधर बेलसरे, किशोर कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, काशिनाथ सराफ, हेरंब जोशी, राहुल कुलकर्णी, कुणाल करंडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महिला शक्तींचाही कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला. कविता कुलकर्णी, पल्लवी वैद्य, शुभांगी कोरडे, निता शेवतेकर, गौरी पावसे, सुप्रिया जोशी, कांचन मुळे, मुग्धा कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रसन्न धुमाळ यांनी केले, तर आभार मंदार पावसे यांनी मानले.

