shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष ससाणे यांना निवेदनाद्वारे मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी..

श्रीरामपूर  : श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य व इतर सुविधा सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावे असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर च्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद चे नवनियुक्त नगराध्यक्षां व मुख्याधिकारी यांना देण्यात आले
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की,
1)श्रीरामपूर बाजारतळ येथे असलेल्या उद्यानामध्ये नागरिकांच्या व्यायामासाठी साहित्य बसवण्यात यावे. व तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसवण्यात यावे व संपूर्ण उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करून जनतेच्या सुविधासाठी खुले करावे.

2)शहरातील सर्व नाली गटारी रोजच्या रोज साफसफाई करण्यात यावी. शहरातील सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे व तसेच जुने असलेल्या सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी.
३) शहरातील रस्ते नव्याने करण्यात यावे व खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे.
४) शहरातील पिण्याचे पाणी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
५) डास निर्मूलनासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक आठवड्यात एक दिवस फवारणी करण्यात यावी.
६) तालुका पोलीस स्टेशन समोरील संत गाडगे महाराज उद्यानातील व्यायामाचे साहित्य त्वरित दुरुस्त करण्यात यावे व लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य नव्याने बसविण्यात यावे.
७) शहरातील प्रत्येक वार्डामध्ये बजरंग व्यायाम शाळेप्रमाणे व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी.
८) शहरातील प्रत्येक वार्डातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे व ज्या भागात स्ट्रीट लाईट नाही त्या भागात स्टेट लाईट बसविण्यात यावी.
९) शहरात गेल्यावर्षभरामध्ये ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम व इतर नगरपालिका अंतर्गत झालेले कामे निकृष्ट दर्जाचे केले अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
१०) शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या इमारत मालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच ज्यांनी पार्किंगची जागा दाखवून इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे व प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केली नाही अशा इमारत बांधकाम मालकावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
११) नगरपरिषद अंतर्गत असलेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात यावी व तसेच सर्व शाळा दुरुस्त करून सीसीटीव्ही बसवण्यात यावी.
१२) शहरांमध्ये ठिकठिकाणी भाजी विक्रेते रोडच्या कडेला बसून बाजी विक्री करतात त्यामुळे ट्रॅफिकला अडचण निर्माण होते त्यामुळे सर्व बाजी विक्रेत्यांना नेहरू भाजी मंडई मध्ये बसविण्याची सक्त ताकीद देण्यात यावी अन्यथा न बसल्यास इतर ठिकाणी  बसल्यास त्यांच्यावर दंड करण्यात यावे. असे एकूण श्रीरामपूर शहरातील प्रमुख समस्येची नवनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासमोर निवेदनाद्वारे कल्पना देण्यात आली व या सर्व मागण्यांच्या श्रीरामपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या असल्याने याच्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.  
निवेदनात दिलेल्या सर्व मागण्या व  शहरातील अनेक वर्षपासून नगरपालिकेवर प्रशासक असल्याने नगरपालिकेच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. निवेदनात दिलेल्या सर्व कामांची दखल घेऊन येत्या आठ ते दहा दिवसात आमच्या मागण्यांवर पाठपुरावा करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यात यावी. 
आमच्या निवेदनाची दखल घेऊन निवेदनात नमूद केलेल्या सर्व कामावर उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने नगरपरिषद कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल व आंदोलन प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास  आपण व आपले नगरपलिका अधिकारी जबाबदार राहतील. आंदोलन कर्ते जबाबदार राहणार नाही येथे नोंद घ्यावी असे यावेळी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष हे म्हणाले.
निवेदन देते प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शराध्यक्ष सतीश कुदळे,नितीन जाधव रोजगार सेना तालुकाध्यक्ष, मनसे श्रीरामपूर तालुका प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल ठोंबरे,आकाश साबळे  तालुका संघटक,मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष अरमान शेख, निलेश सोनवणे शहर संघटक, शहर चिटणीस मच्छिंद्र हिंगमिरे,आर्यन शिंदे मनसे शहर उपाध्यक्ष, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, रवी शिंदे,आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.
close