shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रा. ति. काबरे विद्यालयात स्नेहसंमेलनातून २०२६ चे जल्लोषात स्वागत.

मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्षाची उत्साही सुरुवात.
रा. ति. काबरे विद्यालयात स्नेहसंमेलनातून २०२६ चे जल्लोषात स्वागत.

एरंडोल, जळगाव | ३ जानेवारी २०२६ — एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयात स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून नवीन वर्ष २०२६ चे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनामुळे आनंदी वातावरण निर्माण झाले.

१ जानेवारी रोजी सकाळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी यांच्या हस्ते मैदानी खेळांचे उद्घाटन झाले. दुपारच्या सत्रात ढोल व लेझीम पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व गटशिक्षणाधिकारी श्री. आर. डी. महाजन उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. काकाजी शरदचंद्रजी काबरे, उपाध्यक्ष ॲड. श्री. महेशजी काबरे, सचिव श्री. राजूभाऊ मणियार, सहसचिव श्री. धीरज काबरे, रा. ति. काबरे विद्यालय शालेय समितीचे चेअरमन श्री. अनिलजी बिर्ला, रा. ही. जाजू विद्या मंदिर शालेय समितीचे चेअरमन श्री. जगदीशजी बिर्ला, इंग्लिश मीडियम स्कूल शालेय समितीचे चेअरमन डॉ. श्री. नितीनजी राठी, स. न. झंवर विद्यालय, पाळधी शालेय समितीचे चेअरमन श्री. सुनीलजी झंवर उपस्थित होते.

तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री. परेशजी बिर्ला, श्री. सतीशभाऊ परदेशी, श्री. यशभाऊ मणियार, सौ. कल्पना झंवर, श्री. शालिकभाऊ गायकवाड, जावेद मुजावर, नगरसेवक श्री. नितेश चौधरी, पालक संघाचे सदस्य श्री. भूषण पाटील व श्री. अरुण पाटील, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे, तसेच रा. ही. जाजू विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री कुळकर्णी यांची उपस्थिती होती.

रा. ही. जाजू विद्या मंदिरातील इयत्ता पहिली ते चौथी व रा. ति. काबरे विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित लोकनाट्य, विविध नृत्य व नववर्ष शुभेच्छांवरील सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमामुळे शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

close