देवळाली प्रवरा - ३ जानेवारी
आपल्या जन्मदिनी भेट स्वरूपात हार बुके स्वीकारण्यापेक्षा वही पेण घेऊन गरजू मुलांना देण्याची संकल्पना रुजणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी केले.
प्रसादनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांनी त्यांच्या जन्मदिनी भेट स्वरूपात स्वीकारलेले शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना ढूस बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष ललित शेठ चोरडिया हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, शिवसेनेचे विजुभाऊ गव्हाणे , प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रजनीताई कांबळे, शहर संपर्क प्रमुख गणेश भालके, चैतन्य आल्हाट, सनी जगताप सत्यवान कौसे, विकी जगताप, रामभाऊ राजळे , नितीन पुंड, बबन निमसे, विजू जाधव, चैतन्य आल्हाट, आसाराम आल्हाट, चिंतामण कांबळे, सचिन कांबळे, सलीम भाई शेख, रजनी पांडे, कृष्णा जगताप, शाळेचे मुख्याध्यापक खंडागळे सर, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते..
पुढे बोलताना ढूस म्हणाले की, दोन पाच हजार रुपयांचे शालेय साहित्य वह्या वाटप करून आपल्याला कोणती प्रसिद्धी मिळवायची नाही.. तर., अश्या पद्धतीने जन्मदिनी हार तुरे स्वीकारण्या ऐवजी शालेय साहित्य स्वीकारून ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्यास एका बुकेच्या खर्चामध्ये एका विद्यार्थ्याला वर्षभराच्या वह्या मिळू शकतात.. ही संकल्पना समाजामध्ये रुजणे गरजेचे आहे व हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने असा कार्यक्रम आपण करत आहोत..
प्रसंगी ललित शेठ चोरडिया, आप्पासाहेब कोहकडे, जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.. प्रास्ताविक शिंदे सर आभार खंडागळे सर यांनी केले.

