shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धुळ्यात चाळीसगावचा डंका; शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कबड्डीचा झोनल चॅम्पियन!.

धुळ्यात चाळीसगावचा डंका; शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कबड्डीचा झोनल चॅम्पियन!.

झोन इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा कबड्डीत दमदार विजय; फायनल मध्ये वाडीभोकर संघावर मात.



धुळे | प्रतिनिधी —

धुळे येथे पार पडलेल्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत झोनल कबड्डी (मुले) स्पर्धा 2025-26 (F झोन) मध्ये सौ. शांतादेवी चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निक, चाळीसगाव संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.


स्पर्धेदरम्यान संघाने आक्रमक रेडिंग, अचूक टॅकल्स, मजबूत बचाव व उत्तम सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रत्येक सामना आत्मविश्वासाने जिंकला.फिटनेस, शिस्त आणि खेळातील तांत्रिक समज हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.सेमी फायनलमध्ये जुलालसिंग कॉलेजवर विजयसेमी फायनलमध्ये शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक संघाने जुलालसिंग मंगतू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, चाळीसगाव संघावर मात करत अंतिम फेरी गाठली.

फायनलमध्ये वाडीभोकर संघ पराभूतअंतिम सामन्यात एस.ई.एस. पॉलिटेक्निक कॉलेज, वाडीभोकर (धुळे) संघाविरुद्ध थरारक लढत देत चाळीसगाव संघाने झोनल विजेतेपद पटकावले.

मान्यवरांचे प्रतिक्रिया...

प्रा. नितीन बी. बागुल (प्राचार्य) —
“विद्यार्थ्यांचा खेळातील हा विजय त्यांच्या शिस्तीचा, मेहनतीचा आणि महाविद्यालयाच्या क्रीडा संस्कृतीचा अभिमानास्पद दाखला आहे.”

श्री. प्रशांत वाघ (क्रीडा समन्वयक) —
“संघाने नियोजनबद्ध खेळ आणि संघभावनेच्या जोरावर हा विजय मिळवला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

प्रा. जितेंद्र आर. नेरकर (उपप्राचार्य व सिव्हिल विभागप्रमुख) —
“क्रीडा आणि शिक्षणाचा समतोल साधणारे हे यश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उदाहरण आहे.”

प्रा. किरण व्ही. जाधव (मेकॅनिकल विभागप्रमुख) —
“कठोर सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच संघ शिखरावर पोहोचला.”

प्रा. सुजय जी. अहिरराव (कॉम्प्युटर विभागप्रमुख) —
“संघातील एकजूट आणि तांत्रिक खेळ यामुळे हा विजय शक्य झाला.”

प्रा. तेजस्विनी एस. सूर्यवंशी (ई अँड टीसी विभागप्रमुख) —
“विद्यार्थ्यांनी खेळातून नेतृत्व, संयम आणि आत्मविश्वास सिद्ध केला आहे.”

प्रा. प्रविण देवरे (क्रीडा प्रशिक्षक) —
“नियोजनबद्ध सराव, शिस्त आणि विद्यार्थ्यांची जिद्द हेच या विजयाचे खरे सूत्र आहे.”

 क्रीडा परंपरेत मानाचा तुरा...
या विजयामुळे शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निकच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले असून, परिसरातून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

close