shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन दुर्गवाडा येथील जि.प. प्राथमिक शाळेचा उपक्रम


मोर्शी दिनांक ०२/०१/२०२६
        मोर्शी लगत असलेल्या जि. प .प्राथमिक शाळा, दुर्गवाडा येथील विद्यार्थ्यांसाठी नूतनवर्ष २०२६ च्या निमित्ताने ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेतील मुलांना मुखध्यापिका मंजुळा ठाकरे, हुसेन सर, अर्पिता साबळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

     स्पर्धेमध्ये वर्ग १ते ५चे विद्यार्थी सहभागी होवून चिमुकल्या मुलामुलींनी २०२६ या नूतन वर्षाचा शुभेच्छा स्वयंस्फूर्तीने तयार करून त्यावर संदेश अंकित केला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समारंभ व देखावा दि.०२/०१/२०२६ रोजी सेवानिवृत्त मुखाध्यापक पद श्री. सदाशिवराव बोकडे सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे श्री. गजाननराव चौधरी, पाथरे सर, हुसेन सर , जे.आर.देशमुख,राजेंद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वर्ग मित्रांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा आदान-प्रदान केल्या.प्रमुख पाहुण्यांनी नूतन वर्षाचे महत्त्व विशद केले. जे.आर. देशमुख यांनी 'बुद्धिमत्तेचे खेळ' यांचे धडे दिले.
         श्री. बोकडे सर यांनी विद्यार्थीचे गोड कौतुक करून शाळेने नवीन्यापूर्ण उपक्रम राबविल्या बद्द्ल शिक्षकांचे अभिनंदन केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदशन सौ.एम.आर.ठाकरे यांनी केले.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाकरे मॅडम,साबळे मॅडम, हुसेन सर, यांचे प्रयत्न सार्थकी ठरले!
        कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विदर्थानी मिष्ठान्न जेवणाचा आस्वाद घेतला.
close