जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षलागवड, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची ग्रामस्थांना माहिती.
सुंदरपट्टी (ता.) येथे आज जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षलागवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ. अर्चना प्रेमराज पाटील, उपसरपंच श्री. भास्कर आप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक नंदू पाटील, सीमा सुरेश पाटील, सौ. लिलाबाई विलास पाटील, सौ. प्रतिभा दत्तात्रय पाटील, सौ. भिकूबाई बाबूलाल भिल, शोभाबाई राजेंद्र पाटील, पोलीस पाटील श्री. राहुल गणेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अभियानाची उद्दिष्टे, लाभ व अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वृक्षलागवड करावी, यासाठी विविध रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमामुळे पर्यावरण जतनासोबतच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती घडून आली.


