शिर्डी प्रतिनिधी:
श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने आयोजित शिर्डी ते वणी (सप्तशृंगी गड) पदयात्रा सोहळा नुकताच मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दि. ११ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेच्या समारोपाप्रसंगी गडावर पोहोचून सर्वांनी सप्तशृंगी आईचे दर्शन घेतले. या प्रवासात प्रत्येक गावोगावी ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी पालखीचे व पदयात्रींचे उस्फूर्त स्वागत केले. दि. ११ रोजी सकाळी दर्डे फाटा (मगरे वस्ती) येथे नाश्त्याची सोय करण्यात आली होती, यावेळी मगरे सहकुटुंबाचा संस्थेच्या वतीने शाल व श्री साईबाबांची डायरी देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच, ११ तारखेचा सायंकाळचा मुक्काम रुई (देवगाव) येथील श्री राम कृष्ण हरी वारकरी आश्रमात झाला. तेथे ह.भ.प. माऊली शिंदे महाराज यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. विठ्ठल पवार, संचालक रामभाऊ गागरे, सचिव विलास वाणी व विजुभाऊ शिंदे यांनी भेट देऊन महाराजांचा सत्कार केला.
दि. १२ रोजी दुपारी उगाव येथे गणेश कोल्हे यांनी, तर रात्री तिसगाव येथे ह.भ.प. महंत राकेश गिरी महाराज व मनोज शिरसाठ, सौ. मानसी शिरसाठ यांनी पदयात्रींच्या भोजनाची व मुक्कामाची उत्तम व्यवस्था केली. शिरसाठ कुटुंबाचाही यावेळी सत्कार करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सचिवांनी विशेष परिश्रम घेतले.

