अकोले प्रतिनिधी:-
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम. एस) परीक्षेत कळसेश्वर विद्यालया ने घवघवीत यश मिळवले आहे.
आठवी तील विद्यार्थ्यां साठी असणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विद्यालयातील स्नेहल हरिश्चंद्र मोरे, कावेरी राजेंद्र खताळ, आराध्या संदीप वाकचौरे, श्रेया माधव कोल्हाळ, श्रेया सचिन कोकणे, आरुष अंकुश वाकचौरे, दिव्या सुखदेव वाकचौरे, दर्शन संतोष कातोरे, संनती संदीप ढगे, तनुजा रमेश ढगे, समृद्धी निलेश कोकणे, अक्षरा सुनील शिर्के, आदित्य आनंद गवांदे, सार्थक सुरेश मेंगाळ उत्तीर्ण झाले आहेत.
मुख्याध्यापक संजय शिंदे, शिक्षक शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, प्रशांत जाधव, मनीषा शिंदे, प्रतीक्षा घुले, वंदना सातपुते, कुमार पालवे, सुरेश वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी यांनी अभिनंदन केले.

